सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे कमी होणार पगार ! खाजगी क्षेत्रातील नोकरदारांच्या चिंतेत ‘वाढ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज देशात महागाईचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना खाजगी क्षेत्रातील नोकरधारकांच्या चिंता काही केल्या कमी होण्यास तयार नाहीत. त्यामुळे भाज्या आणि दैनंदिन जीवनाच्या वस्तुंच्या किमती महाग झाल्याने जेवणातील भाजीपाला गायब झाला आहे. असे असतानाच, केंद्र सरकारनं नोकरधारकांना एक मोठा झटका दिला आहे. आता काही महिन्यांनंतर खाजगी कामगारांचा मासिक पगार कमी होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे आता मासिक पगारामध्ये मासिक भत्ताही सामिल केला जाणार आहे त्यामुळे हा निर्णय खाजगी नोकरदारांच्या चिंतेत अजून वाढ झाली असल्याचे चित्र दिसत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकरानं विविध भत्त्यांबाबत योग्य त्या वेळेस निर्णय न घेतल्यामुळं खाजगी कंपन्यानी हा निर्णय घेतल्याचे कळत आहे. खाजगी कंपन्यांनी मासिक पगारात किती पैसे कंपनी जोडणार, किती भत्ता असावा, कोणते भत्ते पगारात सामिल होतील आणि कोणते यात सामिल होणार नाहीत याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाला खाजगी कंपनी आणि सरकार यांच्यातील या वादाचा निकाल काढण्याची जबाबदारी देखील देण्यात आली होती.

भत्ता सामिल झाल्यास वाढणार पीएफ (PF) परंतु पगार होणार कमी
खाजगी उद्योगांची यासंदर्भात त्रिपक्षीय बैठक घेण्यात आली होती त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात आला होता असे सूत्रांकडून कळले त्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता मासिक पगारात सरकारी भत्ता सामिल करण्यात येणार असल्याचे समजत आहे. दरम्यान याचे तोटे आहेत ते म्हणजे, बेसिक पगारावर याचा मोठा परिणाम होईल. पीएफमध्ये वाढ होणार असून पीएफची रक्कम वाढून पगार कमी होणार असल्याचे समजते.

कंपन्यांच्या आहेत या दोन अटी
दरम्यान खाजगी कंपन्यांनी यासाठी दोन अटी ठेवल्या आहेत. पहिली अटीनुसार, सरकारनं कोणता भत्ता सामिल करावा आणि कोणता नाही याबाबत स्पष्टता द्यावी. आणि दुसरी महत्वाची अट म्हणजे, हा नियम सर्वच खाजगी कंपन्यांवर सरसकट लागू होऊ शकणार नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार आणि खाजगी उद्योग धंद्यांच्या बैठकीत याबाबत विचारविनिमय करून सगळ्यांच्या सहमतीने मिळून निर्णय घेतला जाणार आहे.

कधीपासून लागू होऊ शकतो हा नियम
कमीत कमी वेतनसाठी एक ड्राफ्ट कोड सरकारने जारी केला आहे. त्यावरील नियम आणि कायदा तयार करण्यासाठी आराखडा तयार केला जात आहे. ही प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या पगारातून भत्ता कापण्यास सुरुवात होईल.

Visit : Policenama.com