चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीत भाजपची पत्रकार परिषेदत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत भाजपच्या 125 जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महसूलमंत्री चंद्रकांत पाटील , कालिदास कोलंबकर ,मुक्ता टिळक यांचा समावेश आहे.

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू होतात त्यांच्या नावाला विरोध सुरू झाला होता. दूरचा नको, घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे’ असे फलक कोथरूड परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते तसेच ब्राह्मण संघटनांकडूनही ब्राह्मण उमेदवारच द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र हा सगळं विरोध डावलून चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीवर भाजपपक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

युतीत शिवसेनेकडे असणारा कोथरुड मतदारसंघ 2014 ला भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढल्याने भाजपाकडे गेला. सध्या कोथरुड मतदारसंघामध्ये भाजपाच्या मेधा कुलकर्णी या आमदार आहेत.

Visit : Policenama.com