नववर्षाच्या पुर्वसंध्येला शहरातील वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात थर्टीफस्टनिमित्त रात्री तरूणाई मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. चालू वर्षाची सांगता तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एफसी रोड, कॅम्प परिसर तसेच इतर भागात मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. तसेच, रात्री उशीरापर्यंत रस्त्यांवर गर्दी असते. त्यानिमित्त शहरातील काही भागात वाहतूकीत बदल करण्यात आला असून, डायव्हर्जन तसेच विविध चौकातील वाहतुकीचे सिग्नल विहीत वेळेपेक्षा अधिक वेळ चालू ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे नवीन उपायुक्त प्रसाद अक्कानवरू यांनी दिले आहेत.

1.कॅम्प भागातील सायंकाळी 6 पासून गर्दी संपे पर्यंत वाय जंक्शन वरुन एम जी रोडकडे येणारी वाहतुक ही 15 ऑगस्ट चौक येथे बंद करुन ती कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.

2.ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक ही बंद करण्यात येणार आहे.

3.व्होल्गा चौकाकडून महंमदरफी चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.

4.इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारीवाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळविण्यात येईल.

5.सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरी वाहतुक ताबुत स्ट्रीटरोड मार्गे पुढे सोडण्यात येईल.

1 जानेवारी बदल…
तसेच 1 जानेवारी रोजी सकाळी 7 पासून गर्दी संपे पर्यंत नववर्षानिमित्त
दगडूशेठ गणपती मदिरामध्ये भाविकांचे गर्दीचे अनुषंगाने शिवाजी रस्त्यावरील चार चाकी वाहने आणि सर्व प्रकारच्या बसेस वाहतुकीस बंदी करण्यात येणार असून वाहनचालकांनी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

1.स.गो.बर्वे चौकातून स्वारगेटकडे जाण्यासाठी स.गो.बर्वे चौक ते स्वारगेट या मार्गावरील वाहतुक स.गो.बर्वे चौक- जंगली महाराज रोड मार्गे-खंडोजी बाबा चौक-टिळक चौक- टिळकरोडने इच्छितस्थळी जातील.

2..गो.बर्वे चौकातुन पुणे महानगरपालिका भवनकडे जाण्यासाठी स.गो.बर्वे चौक ते म.न.पा या मार्गावरील वाहतुक स.गो.बर्वे चौक- जंगली महाराज रोड मार्गे- झाशी राणी चौक येथून डावीकडे वळून म.न.पा.भवनकडे जातील.

शहरातील विविध चौकातील सिग्नल चालू राहण्याच्या दिनांक-31/12/2019 रोजीचे विहीत वेळेपेक्षा जास्त वेळेत वाढ केले बाबत. (खालील नमुद वाहतुकीचे सिग्नल हे दिनांक 31 डिसेंबर ते 1 जानेवारी रोजी पहाटे 5 पर्यंत पर्यंत सुरू राहतील.)

— सिग्नलची नावे…
पुणे विद्यापीठ चौक, नळस्टॉप चौक, टिळक चौक, पुरम चौक, मार्केटयार्ड चौक, सिहंगड रोड जंक्शन, एबीसी फार्म, गोल्फ क्लब चौक, बोपोडी चौक, खंडोजी बाबा चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, सिमला ऑफिस चौक, शाहीर अमर शेख चौक, जेधे चौक, राजारामपुल चौक, फातिमानगर चौक, नेहरू मेमोरियल चौक, शास्त्रीनगर चौक, सादलबाब चौक, गुडलक चौक, झाशीराणी चौक, जहाँगीर चौक, सेव्हनलव्ह चौक, सावरकर पुतळा चौक, लुल्लानगर चौक, खान्यामारूती चौक, केशवनगर चौक, कोरेगाव पार्क चौक, चर्च चौक खडकी.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/