धक्कादायक ! छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटूंबियांनी मतदानचं केलं नसल्याची चर्चा, जाणून घ्या कारण

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात आज 288 जागांसाठी मतदान प्रक्रीया पूर्ण झाली. मतदारांना मतदान करण्यासाठी सर्वच उमेदवारांनी प्रोत्साहीत केले. मात्र, येवला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ आणि नांदगाव-मनमाड मतदारसंघातील उमेदवार पंकज भुजबळ यांच्यासह कुटुंबीयांनी मतदानचं केलं नसल्याची चर्चा आहे. सर्व उमेदवारांनी आज सकाळी आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मात्र, भुजबळ यांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याची मतदारसंघात सध्या चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि येवला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार छगन भुजबळांसह कुटुंबीयांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याची सध्या चर्चा आहे. धक्कादायक बाब म्हणजे छगन भुजबळांसह त्यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याने मतदानचा हक्का बजावला नाही अशी सध्या चर्चा आहे. छगन भुजबळ यांनी स्वतःच्या पराभवाची धास्ती घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

भुजबळ यांच्या कुटुंबाचे नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये मतदान आहे. नाशिकच्या ग्रामोदय विद्यालयात त्यांचे मतदान आहे. मात्र, मतदारसंघात अडकल्याने मतदानासाठी नाशिकला भुजबळ कुटुंब आलेच नसल्याची माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे. छगन भुजबळ हे येवल्यातून तर त्यांचे पुत्र पंकज भुजबळ हे नांदगाव-मनमाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मतदानाच्या दिवशी छगन भुजबळ येवल्यात तर समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ नांदगावामध्ये ठाण मांडून होते. एवढेच नाही तर दोन्ही चुलत भावांच्या पत्नी शेफाली आणि विशाखा याही नांदगावात ठाण मांडून होत्या. त्यामुळे त्यांना मतदानासाठी नाशिकला येता आले नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान भुजबळांनी मतदान केले असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

Visit  :Policenama.com