नाशिकमधून छगन भुजबळांची आघाडी तर पंकज भुजबळ पिछाडीवर

नाशिक :  पोलीसनामा ऑनलाइन – नाशिकमधून भुजबळ कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. विधानसभेच्या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. येवला मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे 10 हजारांच्या मतांनी आघाडीवर आहेत. मात्र नांदगाव मतदार संघातून लढणारे पंकज भुजबळ हे 13 हजारांच्या मताधिक्याने पिछाडीवर आहेत.

छगन भुजबळ यांना मणी लॉन्ड्रींग केस प्रकरणी भाजप सरकारने तुरुंगाची हवा खायला लावली होती त्यानंतर बाहेर आल्यावर भुजबळांनी आपल्या मतदार संघाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती.

भुजबळ कुटुंबीय प्रचारात एवढे व्यस्त होते त्यांनी स्वतःसाठी मतदान देखील केले नव्हते. अद्याप संपूर्ण मतमोजणीची निकाल हाती यायला थोडा वेळ आहे मात्र छगन भुजबळ हे मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. तर पंकज भुजबळ हे पिछाडीवर आहेत.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत

Visit : Policenama.com