Chhagan Bhujbal Targets Manoj Jarange Patil | भुजबळांनी पुन्हा मनोज जरांगेंना डिवचले, गाढवाची उपमा देत म्हणाले, ”२-४ सभांना झालेली गर्दी पाहून…”

मुंबई : Chhagan Bhujbal Targets Manoj Jarange Patil | बीड जिल्ह्यातील (Beed) वडवणी येथील सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपाला (BJP) लक्ष्य केले होते. मराठा आंदोलकांवर दाखल होत असलेल्या गुन्ह्यांवरून त्यांनी फडणवीसांना इशारा देत, भाजपाच्या ४८ पैकी एकही खासदार निवडून येणार नाही, असे आव्हान दिले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्यांनी जरांगे यांची तुलना गाढवाशी केली.

छगन भुजबळ यांनी म्हटले की, कोण जरांगे? कुठे कोणाला चॅलेंज करावे ? तेवढी त्याची पोहोच आहे का ? त्याचा राजकारणावर काही अभ्यास आहे का? आरक्षणावरही अभ्यास आहे का? की शिक्षण आहे? २-४ सभांना झालेली गर्दी पाहून मनोज जरांगे पाटलांच्या डोक्यात हवा गेली आहे.(Chhagan Bhujbal Targets Manoj Jarange Patil)

छगन भुजबळ म्हणाले, मी मागे एक गोष्ट सांगितली होती. पाण्याच्या टाकी खाली काही पोर उभी होती तिथे विचारल वर काय झाले आहे. तर त्यांनी सांगितले गाढव टाकीच्या वर चढले आहे. त्याला खाली उतरायचे कसे हा विचार करतोय. तिथे गावातील एक ज्येष्ठ आले ते म्हणाले गाढवाला खाली उतरायचे नंतर बघू, पहिले त्याला वर कोणी चढवले ते अगोदर सांगा, असे म्हणत भुजबळ यांनी जरांगेंना गाढवाची उपमा दिली.

दरम्यान, ऐन लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना डिवचले असल्याने याचे तीव्र पडसाद मराठा समाजात देखील उमटण्याची शक्यता आहे. शिवाय, आता मनोज जरांगे कोणते प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | लाच प्रकरणात देवेंद्र खिंवसरा यांना अटकपूर्व जामीन

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)

Pimpri Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका

Nana Patole On Election Commission | नाना पटोलेंचा आयोगाला सवाल, गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूका, मग महाराष्ट्रात…

Dacoity With Arms In Shirur Pune | शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी