पत्नीनं पतीसोबत ‘विनोद’ करण्यासाठी पेटवली काडेपेटीची काडी अन् गेला जीव, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आपल्या पतीबरोबर विनोद करण्यासाठी पत्नीला किंमत मोजावी लागली. घरगुती वादानंतर ती माचिस मधील काडी उगाळत तिच्या पतीची चेष्टा करत होती. या चेष्टेत कपड्यांना आग लागली आणि ती गंभीरपणे जळाली. सहा दिवस उपचारादरम्यान तिला प्रचंड त्रास सहन करावा लागला. ही घटना छत्तीसगडमधील बिलासपूरच्या कोनी पोलिस स्टेशन परिसरातील सेमरताल भागातील आहे.

अधिक माहिती अशी की सोमवारी सेवक सिंह ठाकूर आणि त्यांची पत्नी ललिता सिंह यांच्यात एका गोष्टीवरून वाद झाला. भांडण शांत झाल्यानंतर ललिताने तिचा नवरा सेवक सिंह यास विनोदाने सांगितले की, जर त्यांनी पुन्हा भांडण केले तर मी आग लावून घेईन आणि माचिस मधली काडी पेटवली. नेमक्या याच वेळी जळत्या काडीने ललिताच्या स्वेटरला चुकून स्पर्श झाला. आणि स्वेटरला आग लागली आणि ललिता त्यातच होरपळली.

हे पाहून पती सेवकसिंहने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला आणि कशी तरी आग विझविली. तथापि, त्यावेळी ललिता बर्‍यापैकी जळाली होती. त्यानंतर पति सेवक सिंह तिला तारबाहर भागातील एका खासगी नर्सिंग होममध्ये घेऊन गेले. तेथे उपचारादरम्यान रविवारी तिचा मृत्यू झाला. त्याचवेळी, ललिताने मृत्यूपूर्वी दिलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की विनोद करण्याच्या भावनेतून नवऱ्याला घाबरवण्यासाठी माचिस मधली काडी स्वतः पेटविली होती. दरम्यान, आग लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/