बॉलिवूडमधील ‘ही’ चिमुरडी पोलीस अधिकाऱ्याची ‘लेक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये असे अनेक बाल कलाकार आहेत जे आपल्या करिअरला सुरुवात करतानाच हिट होतात. मृणाल जाधव हे असंच एक नाव आहे. पदार्पणातच मृणालनं एकापेक्षा एक हिट सिनेमात काम करून आपल्या अ‍ॅक्टींगचा जलवा दाखवला आहे. सध्या ती एक लोकप्रिय कलाकार आहे.

मृणाल जाधव नेमकी कोण असा प्रश्न नक्कीच काहींना पडला असेल. तुम्ही जर दृश्यम सिनेमा पाहिला असेल तर तुमच्या डोळ्यासमोर एक निरागस आणि गोंडस चेहरा येईल. हीच ती मृणाल जिनं अजय देवगणसोबत काम केलं आहे. तुम्हाला माहिती आहे का मृणालचे बाबा मुंबई पोलीस खात्यात कार्यरत आहेत. मृणालला अ‍ॅक्टींगमध्ये येण्यासााठी तिच्या बाबांनी प्रोत्साहन दिलं आहे. कारण तिचं आईपेक्षा वडिलांसोबत जास्त चांगलं बाँडिंग आहे. जेव्हा मृणाल शुटींगमध्ये बिजी असते तेव्हा तिला बाबांसोबत जास्त वेळ घालवता येत नाही. तरीही तिचा प्रयत्न असतो की, बाबांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवला जाईल.

याबाबत बोलताना मृणाल म्हणते, “माझे बाबा मुंबई पोलीस खात्यात आहेत याचा मला अभिमान आहे. त्यांच्या कामगिरीचा आदर्श घेऊन मी माझे व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करत आहे.” असं तिनं सांगितलं.

मृणालच्या वकफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं तू ही रे, लय भारी, नागरिक, कोर्ट, टाईमपास 2, अ पेईंग घोस्ट, अंड्याचा फंडा अशा अनेक सिनेमांत काम केलं आहे. मृणालनं मालिकेतही काम केलं आहे. राधा ही बावरी, उंच माझा धोका या तिच्या काही मालिकांची नावं सांगता येतील. लय भारी या सिनेमातील तिची रुक्मिणीची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली होती.