पुणे : दत्तवाडीत नाल्यात पडून चिमुरडा बेपत्ता

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – दत्तवाडी परिसरात रक्षालेखा सोसायटीजवळ खेळत असताना दीड वर्षाचा चिमुरडा नाल्यामध्ये पडून बेपत्ता झाल्याची घटना घडली. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

संस्कार सुर्यकांत साबळे (वय दीड वर्षे) असे नाल्यात पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तवाडीतील रक्षालेखा सोसायटीजवळ साबळे कुटुंबिय राहतात. संस्कार खेळताना असताना येथील नाल्यातील पाण्यात पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार एरंडवणा अग्निशमन केंद्राची गाडी घटनास्थळी पोहचली. जवानांनी नाल्यातील पाण्यात तब्बल दोन तास चिमुरड्याचा शोध घेतला. पण, संस्कार सापडला नाही. अंधार झाल्यामुळे त्याचा शोध घेण्यास अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले आहे. गुरूवारी पुन्हा सकाळी मुलाचा शोध घेण्यात येणार आहे. दत्तवाडीतून हा नाला नदीला जाऊन मिळतो. त्यामुळे संस्कार पाण्यात वाहून गेला असण्याची शक्यता आहे.सोसायटीजवळ खेळत असताना संस्कार नाल्यात पडला असल्याचे नागरिकांनी सांगितले.