चिंतामणी : ‘कोरोना’मुळे सर्व भक्तांच्या उत्साहावर ‘विरझन’ !

थेऊर पोलिसनामा ऑनलाइन : आज भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी असल्याने राज्यात सर्वत्र गणपती बाप्पाचे धुमधडाक्याने आगमन होत परंतु जगावर कोरोना महामारीचे सावट पसरल्याने यावर्षी प्रत्येक सणावर बंदी अथवा मर्यादा आल्या.

थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र येथे श्री चिंतामणी गणपतीचे स्वयंभू स्थान असून राज्यासह देशाच्या अनेक भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली त्यामुळे भक्तांना आपापल्या घरी राहूनच देवाची प्रार्थना करण्याची वेळ आली. महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील देवालये दर्शनासाठी खुली केली आहेत परंतु राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याने पुनःश्च हरिॐ जरी झाल असल तरीही देवालयाची दारे आणखी उघडलेली नाहीत. ही देवालये उघडायला पाहिजेत अशी अनेकांनी मागणी केली असली तरीही निर्णय होत नाही. या तिर्थक्षेत्री अनेक व्यावसायिकांचे पुरते दिवाळे उडाले आहे गेली सहा महिने सर्व व्यवहार बंद आहेत उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे सुरक्षेचे नियम घालून देवालये उघडी करावीत अशी मागणी होत आहे.

थेऊर येथे आज नेहमीप्रमाणे दैनंदिन महापुजा करण्यात आली देवालयाचे पुजारी भूषण आगलावे यांनी पहाटे महापुजा केली त्यानंतर चिंचवड देवस्थानच्या वतीने मोरेश्वर पेंडसे यांनी महापुजा केली देऊळ दर्शनासाठी बंद असल्याने बाहेर गावाहून आलेल्या भाविकांना दरवाजाचे दर्शन घेऊन परतावे लागले दरवर्षी येथे मोठा उत्सव साजरा होतो दर्शनासाठी मोठी गर्दी होते परंतु कोरोना मुळे सर्व भक्तांच्या उत्साहावर विरझन पडले