केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर बंदी

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासुन कांद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. दिवसेंदिवस कांद्याच्या दरात वाढ होत असल्याने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने आज कांद्याच्या निर्यातीवर बंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कांद्याचे दर अटोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.

दिवसेंदिवस कांद्या महाग होत चालला होता. कांद्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या डोळयातून अक्षरशः पाणीच आणले होते. दिवाळीपर्यंत कांद्याचे दर कडाडलेलेच राहतील अशी शक्यता व्यक्‍त होत असतानाच आज (रविवार) अचानकपणे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. शेतकर्‍यांकडे अगदी कमी प्रमाणात कांदा शिल्‍लक असल्याने भाव वाढला होता. आता शेतकर्‍यांकडे कांदा शिल्‍लक नाही अशी स्थिती आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं सर्वसामान्य नागरिकांना नक्‍कीच फायदा होणार आहे.

Visit : Policenama.com