आम्ही छगन भुजबळांची व्यवस्था ‘नीट’ लावून ठेवली आहे : देवेंद्र फडणवीस

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. छगन भुजबळ सारखा नटसम्राट संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला नाही. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच राज ठाकरेंच्या जेल मध्ये टाकले पुढे काय ? या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले आहे. आता तर खटला सुरु होणार आहे. आणि खटला सुरु झाल्या नंतर त्यांची व्यवस्था नीट लावून ठेवली आहे. असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या २९ एप्रिलला होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिक येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसने इंजिन किरायाने घेतले आहे. याप्रमाणे ते इंजिन हालत नाही. डुलत नाही, चालत नाही. तशीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची होणार आहे. यांच्या घडाळ्यात १० वाजून १० मिनिटे वाजले आहेत. आणि २३ मे ला त्याच घडाळ्यात १२ वाजल्या शिवाय राहाणार नाही. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मला छगन भुजबळांचे कधी कधी इतके आश्चर्य वाटते की काय जोरदार भाषण करतात. म्हणजे असा नटसम्राट संपूर्ण महाराष्ट्राने पहिला नाही. असा टोलाही त्यांनी लगावला. याचबरोबर, छगन भुजबळ त्यांच्या भाषणात म्हणतात मला जेल मध्ये टाका, मी जेल मद्ये जायला तयार आहे, मला या सरकारने जेल मध्ये टाकलं. आहो भुजबळ साहेब तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून जेल मध्ये गेला नाही. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले म्हणून तुम्हाला जेल मध्ये नाही टाकले. नाशिकसाठी आंदोलन करता म्हणून जेल मध्ये नाही टाकले. तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकले. तुम्ही जनतेच्या तिजोऱ्या लुटल्या म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकले. काळा पैसा कमावला म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकले. असेही त्यांनी म्हंटले.

तसेच काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे विचारत होते ना जेल मध्ये टाकले पुढे काय, आज देखिये होता है क्या? आता तर बेलवर बाहेर आहेत. आता केस चालणार आहे. असा इशाराही त्यांनी दिला. आणि तुम्ही काळजी करू नका आपली न्याय देवता सक्षम आहे. आता तर खटला सुरु होणार आहे. आणि खटला सुरु झाल्या नंतर त्यांची व्यवस्था नीट लावून ठेवली आहे. असेही त्यांनी म्हंटले.