CM Eknath Shinde | 2024 मध्ये पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी एनडीए (NDA) आणि विरोधक यूपीए (UPA) यांनी एकमेकांविरुद्ध मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपविरोधी (BJP) पक्षांची मंगळवारी बंगळुरूत बैठक झाली. तर विरोधकांना चितपट करत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी एनडीएची एक बैठक (NDA Meeting) दिल्लीत होत आहे. या दोन्ही बैठकांना दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत. 2024 मध्ये देशात पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळेल, असा विश्वास एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

 

दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, एनडीएमध्ये 38 घटकपक्ष सहभागी आहेत. त्यामुळे 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वामध्ये देशात पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळेल. महाराष्ट्रात अजित पवार (Ajit Pawar) सोबत आल्याने एनडीए मजबूत झाली आहे. मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्ही काम करत आहोत. महाराष्ट्रात अजितदादा आणि त्यांचे सहकारी सोबत आल्याने ताकद वाढली आहे, असे शिंदे यांनी म्हटले.

 

 

महाराष्ट्रात 45+ जागा निवडून येतील

आधी मी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काम करत होतो. आता अजितदादा सोबत आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बदलेली आहे. एक मजबूत सरकार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे 45+ जागा महाराष्ट्रातून नक्की येतील किंबहूना बदलत्या परिस्थितीनुसार क्लीन स्वीप होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

मोदींनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली

एकीकडे विचारधारा असलेले संघटन आहे तर दुसरीकडे विरोधक नेता ठरवू शकत नाहीत.
2024 मध्ये संपूर्ण देशात पुन्हा एकदा एनडीएला बहुमत मिळणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. संपूर्ण जगात आपल्या देशाचे नाव आदराने घेतले जाते.
त्यामुळे विरोधक जेवढे आरोप लावतील तेवढे एनडीए बळकट होईल, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

 

Web Title :  CM Eknath Shinde | maharashtra cm eknath shinde said nda will once again get
majority in the entire country in 2024 lok sabha election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा