काँग्रेस औरंगाबादचा उमेदवारही बदलण्याच्या तयारीत ?

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला उधाण आले आहे. सर्व पक्षांमध्ये उमेदवारांवरून नवनवीन वाद सुरु आहेत. तर उमेदवारीवरून पक्षात नाराजीचे सुर दिसत आहेत. काँग्रेसने चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार दोन वेळा बदलला. त्यानंतर आता काँग्रेस औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. कारण उमेदवारी जाहिर केलेले उमेदवार सुभाष झांबड यांना काँग्रेसने अद्याप बी फॉर्म दिला नाही. त्यामुळे काँग्रेस उमेदवार बदलण्याच्या शक्यता आहेत.

काँग्रेसकडून सुभाष झांबड यांना काँग्रेसकडून बी फॉर्म दिला गेला नाही. बी फॉर्म देण्याची मुदत ४ एप्रिल आहे. तरही बी फॉर्म देण्यात न आल्याने हा तर्क लावला जात आहे. मात्र अर्जात राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार असा उल्लेख करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसवर नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी आधीच काँग्रेसमध्ये बंड पुकारले आहे. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर ते आज काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी अपक्ष निवडणुक लढवली तर काँग्रेसचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे औरंगाबादमधील काँग्रेसचा उमेदवार बदलण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.