‘कोरोना’बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

पोलिसनामा ऑनलाईन – देशात रुग्णांच्या संख्येने 20 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे आता भारत ब्राझिलच्या मागोमाग आहे. ब्राझिलमध्ये 28 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. यावर काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखांच्या पार गेली असून मोदी सरकार गायब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येने 20 लाखांचा टप्पा पार केला आहे. परंतु मोदी सरकार गायब आहे, अशी टीका गांधी यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. यापूर्वीही त्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. 10 ऑगस्टपूर्वी देशातील करोनाबाधितांची संख्या 20 लाखांच्यावर जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. जगात ज्या देशांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत त्यात भारताचा क्रमांक तिसरा आहे. अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या 50 लाखांपेक्षा जास्त, ब्राझिलमध्ये 28 लाखांपेक्षा जास्त तर भारतात 20 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. रशियात 8 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर दक्षिण अफ्रिकेतल्या रुग्णांची संख्या 5 लाखांच्या पुढे आहे. मेक्सिकोमध्ये 4 लाखांच्या पुढे रुग्णसंख्या आहे. पेरुमध्येही चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या आहे. जगातल्या 200 पेक्षा जास्त देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला आहे.