मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमावर काँग्रेस, राष्ट्रवादीचा ‘बहिष्कार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त आज (रविवार) राणी बागेतील पशू-पक्षी यांच्या दालनांचे लोकार्पण आणि उड्डाणपुलांचे भूमिपूजन तसेच मियावाकी पध्दतीनं वृक्षारोपन होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाची वर्तमान पत्रामध्ये प्रसिध्द झालेल्या जाहिरातीमध्ये नावे न टाकल्यानं काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या गटनेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या जी/दक्षिण विभागातील लोअर परळ रेल्वे स्टानकानजीकच्या ना.म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील डिलाइल पुलाच्या रस्त्यांचे भूमिपूजन, संत गाडगे महाराज चौक ते केशवराव खाडये मार्ग व संत गाडगे महाराज चौक ते डॉ. ई. मोझेस मार्ग येथील रेल्वेवरील 2 उड्डाणपुलांचे भूमिपूजन, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथील प्राण्यांचे नवीन प्रदर्शनी कक्ष यांचे लोकार्पण यासह मुंबईत 64 ठिकाणी मियावाकी पध्दतीनं लागवड करण्याच्या वनीकरण मोहिमेचा शुभारंभ वडाळा येथील भक्ती पार्क येथे हे कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या गटनेत्यांनी नाराजी व्यक्त करून कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्यानं ते निर्णय बदलतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –