सांगली-कोल्हापूरात महायुती पिछाडीवर, सांगलीत 6 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस आहे. आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणाहून वेगवेगळी आकडेवारी समोर येताना दिसत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, सांगली कोल्हापूरात 10 जागांवर महायुती पिछाडीवर असताना दिसत आहे. मुख्य म्हणजे सांगलीत 6 ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर आहे.

सांगली-कोल्हापूरला काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसाच्या पुराचा नागरिकांना चांगलाचा फटका बसला होता. याच काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरु होती. यानंतर या मुद्द्यावरून मात्र विरोधी पक्षाने सत्ताधारी भाजप पक्षाला धारेवर धरले होते.

जनता ऐन संकटात असताना सत्ताधारी पक्षाने नागिरकांकडे पाठ फिरवली अशी टीका सत्ताधारी भाजपवर होताना दिसली. नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण पहायला मिळाले होते. याचाच परिणाम म्हणून सांगली-कोल्हापूरात महायुती पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत.