स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटाचे पैसे काँग्रेस भरेल, सोनिया गांधींचा मोदी सरकारवर ‘हल्लाबोल’

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरु असताना परराज्यातील नागरिकांना घरी जाण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता नागरिकांनी रेल्वे पृवास केल्यानंतर त्यांच्या तिकीटाचे पैसे भरणार कोण असा सवाल करीत राजकारण सुुरू करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर स्थलांतरित मजुरांकडून रेल्वे तिकिटाचे पैसे घेण्याच्या मुद्दावरुन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस या मजुरांच्या तिकिटांचे पैसे भरेल असे सोनिया गांधी यांनी जाहीर केले आहे.

लॉकडाउनमुळे विविध राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांची घरी परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.स्थलांतरित मजुरांसाठी विविध राज्यांमधून ट्रेन सोडण्यात येत आहेत. पण त्यासाठी ट्रेन प्रवासाचे तिकिट शुल्क आकारले जात आहे. त्यावरुन सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळ आता राष्ट्रीय पातळीवरील दोन्ही राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक लढाई सुरु झाली आहे.