Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये ‘आपल्या’ नुकसानाची भरपाई करत आहेत ‘हे’ भारतीय ऑलराऊंडर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू आहे. ज्यामुळे खेळाडू देखील आपल्या घरातच आहेत आणि त्यांच्याकडे कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायची हीच वेळ आहे. भारताचा अष्टपैलू केदार जाधवने देखील ही संधी साधली आहे. जाधवने म्हटले की, तो या वेळेचा वापर कुटुंबासोबत घालवून त्या वेळेची भरपाई करत आहे, जी वेळ भारत आणि आपल्या राज्याकडून खेळताना सुटली होती. विशेषतः आपल्या पाच वर्षाच्या मुलीला वेळ देऊ शकला नव्हता. जाधव भारताकडून आतापर्यंत ७३ वनडे आणि ९ इंटरनॅशनल खेळला आहे. भारताकडून पदार्पण करत असताना त्याच्या मुलीचा जन्म झाल्याचे त्याने सांगितले. यावर्षी तो आपल्या मुलीला खूप मुश्किलीने वेळ देऊ शकला आहे. पण आता घरात राहिल्यामुळे त्याला समजत आहे की, त्याची मुलगी हुशार मुलगी कशी झाली, त्याने जितका विचारही केला नव्हता, त्यापेक्षा जास्त समजदार त्याची मुलगी आहे.

एकत्र जेवण्याचा प्रयत्न
केदार जाधव याला त्याचे बालपण आठवत त्याने सांगितले की, त्याच्या तीन बहिणी आणि आई-वडील याच प्रयत्नात असत की, सगळेजण एकदा तरी एकत्र जेवण करतील. पण काळाबरोबर या गोष्टी पुसट झाल्या. पण आता जेव्हापासून आम्हाला संधी मिळाली आहे, आम्ही परत ते करण्यास सुरवात केली आहे.

डॉक्टरांसमोर काही नाही
बाकीच्या खेळाडूंप्रमाणेच केदार जाधव यानेही कोरोना व्हायरस पीडितांना देणगी दिली आहे. त्याने महाराष्ट्र सीएम रिलीफ फंड आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरला देणगी दिली आहे.

त्याने म्हटले की, या समस्येला तोंड देण्यासाठी योगदान देणे आपले कर्तव्य आहे. जीव वाचवण्यासाठी डॉक्टर रात्रंदिवस गुंतलेले असतात. डॉक्टर कोणताही विचार न करता काम करत आहेत. तसेच डॉक्टरांच्या कामासमोर आपण काहीही करु शकत नाही, असेही त्याने म्हटले.