Coronavirus : बारामतीत प्रथमचं प्लाझ्मा थेरपीचा वापर, रुग्णाला मिळाले जीवदान

ADV

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती शहरात कोरोनावर गुणकारी ठरणाऱ्या प्लाझ्मा थेरपीचा पहिल्यांदा वापर करण्यात आला. या थेरपीमुळे इंदापूर तालुक्यातील एका नेत्याला जीवदान मिळाले आहे. कोरोनाच्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी गुणकारी ठरत आहे. मात्र या अगोदर बारामतीत रेमडेसीव्हिर इंजेक्शन देऊन रुग्णांना कोरोनामुक्त करण्यावर भर दिला जात होता.

अद्याप तरी बारामतीत या थेरपीचा वापर करण्यात आला नव्हता. प्रथमच या थेरपीने जीवदान मिळाले आहे. बारामती शहरातील सिल्वर ज्युबिली रुग्णालयात या थेरपिचा वापर करून रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले. त्या रुग्णाला १२ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, डॉ. राहुल मस्तूद, डॉ. महेश जगताप, डॉ. निर्मल वाघमारे, डॉ. समाधान चवरे, डॉ. रणजित मोहिते, डॉ. नरुटे यांच्याकडून या रुग्णावर उपचार करण्यात आले.

ADV

सगळे उपचार करून झाले तर त्यामध्ये काहीच सुधारणा होत नव्हती. मग त्यावर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी पुण्यातून काही तासात प्लाझ्मा थेरपीची व्यवस्था केली. हा प्रथम करण्यात आलेला प्रयोग यशस्वी झाला. दरम्यान शहर आणि तालुक्यातील कोरोना आटोक्यात आल्याने बारामतीकराना यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात ३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकूण आरटीपीसीआर नमुने १८१, एकूण पॉझिटिव्ह १७, खाजगी लॅबमार्फत तपासण्यात आलेले एकूण आरटीपीसीआर- २८, यापैकी पॉझिटिव्ह – ५ , कालचे एकूण अँटीजेन – ८६, त्यापैकी पॉझिटिव्ह – १३, शहरात १८ तर ग्रामीणमध्ये २१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

बारामती एकूण रुग्ण – ३२८५
बरे झालेले रुग्ण – २५१३
कोरोनामुळे मृत्यू – ८२