2022 च्या पुर्वी ‘कोरोना’पासून नाही मिळणार मुक्ती, WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसच्या एक प्रभावशाली वॅक्सीनची संपर्णू जग आतुरतेने वाट पहात आहे. याच दरम्यान डब्ल्यूएचओ (जागतिक आरोग्य संघटना) च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांच्या वक्तव्याने लोकांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी मंगळवारी म्हटले की, पुन्हा जीवन सामान्यपणे सुरू होण्यासाठी 2022 पूर्वी योग्य प्रमाणात वॅक्सीन मिळणे अशक्य आहे.

स्वामीनाथन यांनी म्हटले की, डब्ल्यूएचओच्या कोवॅक्स उपक्रमांतर्गत उत्पन्नाच्या विविध स्तरांच्या देशांना समन्या रूपात वॅक्सीन पोहचण्याचे काम केले जाईल. यासाठी पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत कोट्यवधी डोस तयार करावे लागतील. याचा अर्थ असा होतो की, याच्याशी संबंधीत सर्व देश किंवा अर्थव्यवस्थांना काही ना काही जरूर मिळेल.

मात्र, जोपर्यंत वॅक्सीनचे प्रॉडक्शन वाढत नाही, तोपर्यंत मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगची गरज बदलण्यासाठी खुप कमी प्रमाणात डोस उपलब्ध होतील. 2021 च्या अखेरपर्यंत वॅक्सीनचे दोन अरब डोस मिळवण्याचे लक्ष्य ठेवले जाईल.

त्यांनी म्हटले की, लोकांना असे वाटत आहे की, पुढील वर्षात जानेवारीमध्ये जगाला वॅक्सीन मिळेल आणि ते पुन्हा एकदा सामान्य जीवन जगू लागतील. प्रत्यक्षात 2021 च्या मध्यात आपण वॅक्सीन रोलआऊटचे योग्य मुल्यांकन करू शकतो, 2021 च्या सुरूवातीला तर या वॅक्सीनचे परिणाम पहाण्यास सुरू करतील.

मात्र, याबाबतीत चीन मोठ्या आक्रमकतेने पुढे जात आहे. चायनीज सेंटर फॉर डिसीज अँड प्रीव्हेन्शन के वू गिजेन यांनी मंगळवारी म्हटले, नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत चीनला स्थानिक रूपात वॅक्सीन डेव्हलप करण्याचा अ‍ॅक्सेस मिळेल. तिकडे, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा चार आठवड्यांच्या आत वॅक्सीन देण्याचा दावा केला आहे. राजकारणाच्या दबावात कंपन्यासुद्धा इमर्जन्सीमध्ये वॅक्सीन वापरण्याचे लायसन्स जारी करू शकतात.

स्वामीनाथन म्हणाल्या, सर्व ट्रायल ज्या सुरू आहेत, त्यामध्ये जास्त नाही तर कमीत कमी 12 महिन्यांचा वेळ लागेल. हा तो काळा असेल जेव्हा तुम्ही पाहू शकाल की, पहिल्या काही आठवड्यात वॅक्सीनचे काही साईडइफेक्ट तर नाहीत ना. कारण ही एक महामारी आहे, यासाठी अनेक रेग्युलेटरी इमर्जन्सी वापराची लिस्ट बनवतील. परंतु, यासाठी सुद्धा मापदंड ठरवणे जरूरी आहे.

त्यांनी म्हटले की, आपल्याला केवळ वॅक्सीनचा प्रभाव पहायचा आहे, परंतु मला वाटते की, लोकांसाठी सुरक्षा जास्त महत्वाची आहे. अमेरिकेचे एफडीए लवकरच वॅक्सीनच्या इमर्जन्सी वापरासाठी गाईडलाईन जारी करणार आहे.

चीन जुलैपासूनच आपल्या पदाधिकार्‍यांवर इमर्जन्सी यूज ऑथोरायजेशनच्या अंतर्गत तीन वॅक्सीन वापरत आहे. तर एक वॅक्सीन जूनपासूनच सैनिकांवर वापरली जात आहे. देशातील एका फार्मास्यूटिकल कंपनीच्या एका सीनियर अधिकार्‍याने सांगितले की, देशात आतापर्यंत लाखो लोकांना वॅक्सीनेट करण्यात आले आहे.

स्वामीनाथन यांना जेव्हा चीन आणि अमेरिकेच्या स्थितीबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, नॅशनल रेग्युलेटर्सला आपल्या सीमांमध्ये असे करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांनी हे सुद्धा म्हटलीे की, रेग्युलेटर्सला डेटासाठी कंपन्यांना डेडलाइन दिली पाहिजे. जर ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात महत्वाच्या अटी पूर्ण केल्या नसतील तर इर्मजन्सी लायसन्स रद्द केले जाऊ शकते.