‘इथं’ सरकारी ‘क्वारंटाईन’मध्ये असणारे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रूग्ण करत आहेत ‘सेक्स’ !

पोलिसनामा ऑनलाइन –देशतील लॉकडाऊन हा 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. भारतासह अनेक देशात लॉकडाऊन आहेत. अशात अनेक लोकं अशी आहेत जी आपल्या चुका काही केल्या सुधारत नाहीत असं दिसत आहेत. असंच एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे.

अशी माहिती समोर आली आहे की, कोरोनामुळं क्वरांटाईन केलेले संशयित आता एकमेकांसोबत सेक्स करू लागले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, सरकारी क्वारंटाईनमध्ये असणारे अनेक लोक आता शरीरसंबंध ठेवत आहेत. असं सांगितलं जात आहे की, हे प्रकरण युगांडातील आहे. आरोग्य विभागही संशयित रुग्णांच्या अशा वागण्यानं परेशान आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युगांडाच्या आरोग्य मंत्रालयातील स्थायी सचिव डियाना अटविने यांनी रेडिओ वन मध्ये सांगितलं की, त्यांना या गोष्टीची चिंता आहे की, कोरोनाला हरवण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू आहे त्यावर अशा वागण्यानं पाणी फिरणार आहे. लोक क्वारंटाईन सेंटर्सवर एकमेकांना भेटत आहेत सेक्स करत आहेत. एकमेकांच्या खोलीत जात आहे. अशानं तर कोरोनाचं संक्रमण अजून वाढेल.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, युगांडाचे नागरिक कोरोनाबद्दल अजिबात गंभीर नाहीत. क्वरांटाईनमध्ये असणारे काही लोक सेक्शुअल अफेअर चालवत आहेत. अनोळखी लोकांसोबत अफेअर सोबतच काही लोक आपले कलीग्स आणि दोस्तांना भेटण्यासाठी हॉटेलमधून इकडे तिकडे फिरताना दिसत आहेत.