Coronavirus : राज्यात रात्रीतून ‘कोरोना’चे 60 नवे रूग्ण, महाराष्ट्राचा आकडा 1078 वर

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस वाढणारा संक्रमितांचा आकडा 5 हजारच्या आसपास पोहोचला आहे. त्यात महाराष्ट्रातील आकडेवारी धक्कादायक आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्रीतून जवळपास 60 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात मुंबईत 44, पुण्यात 9, अंगर, अकोला आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक रुग्ण तर नागपुरात नवीन 4 संक्रमित आढळले आहेत. देशात सर्वाधिक आकडा महाराष्ट्रातून समोर येत असून 5 हजारपैकी 1 हजार 78 रुग्ण केवळ महाराष्ट्रातील आहेत. मंगळवारी दिवसभरात 150 रुग्णांची नोंद झाल्यावर रात्रीतून अवघ्या 12 तासांत पुन्हा 60 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

माहितीनुसार, देशात कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकडा 5 हजाराच्या पुढे गेला आहे. तर मुताचा आकडा 149 वर गेला आहे. त्यातल्यात्यात दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 401 लोक बरे झाले आहेत. दरम्यान, वाढती आकडेवारी पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. देशपातळीवर असलेल्या या लॉकडाऊनसंदर्भात 11 किंवा 12 एप्रिल ला केंद्र सरकार निर्णय घेणार असल्याचे समजते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like