239 शास्त्रज्ञांनी WHO ला पत्राव्दारे दिला ‘गंभीर’ इशारा, ‘कोरोना’बद्दल सांगितली ‘ही’ महत्वाची माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील 239 शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला कोरोना विषाणूबद्दल पत्र लिहून चेतावणी दिली आहे. 32 देशांतील या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणू देखील हवेत असतो. या पत्राशी संबंधित गोष्टी येत्या काळात जर्नलमध्ये प्रकाशित कराव्यात अशी शास्त्रज्ञांची इच्छा होती, परंतु त्याआधी ते माध्यमांतून लीक झाले. वैज्ञानिकांनी डब्ल्यूएचओला मार्गदर्शक तत्त्वे बदलण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसीर, डब्ल्यूएचओला लिहिलेल्या पत्रात शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, हवेतले छोटे कणांमुळे देखील लोक संक्रमित होत आहेत. पत्रात असे लिहिले आहे की, शास्त्रज्ञांना वाटते की कोरोना विषाणू जास्त काळ हवेमध्ये राहू शकतो आणि अनेक मीटर प्रवास करुन जवळपासच्या लोकांना संक्रमित करू शकतो. जर शास्त्रज्ञांच्या बाबतीत हे सत्य असेल तर, बंद खोल्या किंवा अशा इतर ठिकाणी संसर्ग खूप वेगाने पसरत असेल. अशा परिस्थितीत लोकांना शाळा, दुकान आणि अशा इतर ठिकाणी काम करण्यासाठी अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. बसमध्ये प्रवास करणे देखील धोकादायक ठरू शकते, कारण सुमारे 2 मीटर अंतरावर बसल्यानंतरही लोकांना कोरोना विषाणूची लागण होऊ शकते.

हे पत्र लिहिणाऱ्या वैज्ञानिकांच्या टीमचा भाग असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रोफेसर लिडिया मोरावस्का म्हणाल्या की, ‘आम्हाला याबद्दल शंभर टक्के विश्वास आहे.’ डब्ल्यूएचओला शास्त्रज्ञांच्या नवीन दाव्यांचा विचार करता आपली मार्गदर्शक तत्त्वे बदलण्याची आवश्यकता असू शकते. ज्या जागी व्हॅंटिलेशन अधिक चांगले नाही अशा ठिकाणी बरीच दूर बसूनही लोकांना मास्क घालावे लागतील. डब्ल्यूएचओ आतापर्यंत सांगत आहे की, संसर्ग झालेल्या व्यक्तीला खोकला किंवा शिंका येण्यादरम्यान Large Respiratory Droplets ने कोरोना पसरतो.