माजी खा. अनिल शिरोळे यांना ‘कोरोना’ची लागण

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे, अनेक कोरोना योद्धा, सेलेब्स तसेच राजकारणीही या विषाणूच्या कचाट्यात सापडत आहे. त्यात आता भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.

शिरोळे यांनी म्हंटले कि, ‘मी COVID19 साठी सकारात्मक चाचणी केली आहे. माझी लक्षणे सौम्य आहेत, परंतु खबरदारी म्हणून मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शेवटच्या काही दिवसात माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्वांना मी विनंती करतो की, लक्षणे आढळल्यास खबरदारी म्हणून तातडीने चाचणी करावी आणि विलगीकरण बाळगावे.’