हवेतूनही पसरतोय ‘कोरोना’चा संसर्ग, 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांनी WHO ला दिला ‘हा’ गंभीर इशारा, लिहीलं ‘ओपन लेटर’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना विषाणूचा प्रसार हवेच्या माध्यमातून होत असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. विषाणूचे छोटे छोटे कण हवेतही जिवंत राहतात आणि त्यामुळे लोकांमध्ये त्याचा संसर्ग होऊ शकतो, असे 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांच्या संशोधनात समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनाने व्हायरसचा प्रादुर्भाव कसा होतो यासंदर्भातील माहिती जारी केली होती. त्यानुसार हा विषाणू हवेतून पसरत नाही असा दावा करण्यात आला होता.

‘शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत एक पत्र लिहले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार हवेतून होत आहे. त्याचे सर्व पुरावेही आहेत. त्यानुसार करोनाच्या विषाणूचे छोटे-छोटे कण हवेत तरंगतात. ते लोकांमध्ये करोनाचा संसर्ग होण्यास पुरेशे आहेत. त्यामुळे यावर पुन्हा एकदा संशोधन करण्याची विनंती आहे.’ हे पत्र सायन्टिफिक जर्नलमध्ये पुढील आठवड्यात प्रकाशित होणार आहे.

2019 वर्षाअखेरीस चीनमधील वुहान येथे करोना व्हायरस आढळून आला होता. यानंतर आता जवळपास सर्वंच जगभरातील देशांमध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. हवेच्या माध्यमातून विषाणूचा प्रसार होत असल्याच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या दाव्यावर जागतिक आरोग्य संघटनेकडे प्रतिक्रिया मागवली आहे. पण यावर कोणतेही उत्तर आलेले नाही.