मौलाना साद यांचा नवीन ऑडिओ – जर ‘तुम्ही’ सरकारबरोबर ‘संघर्ष’ केला तर ‘तो’ बदला, ‘सहकार्य’ केले तर…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   मागील महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दीन भागात असलेल्या मरकजमध्ये तबलीगी जमातचा एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जमातमधील बऱ्याच लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्याचवेळी जेथे हे जमातचे लोक परत गेले आणि त्यांच्या संपर्कात आल्यामुळे इतर लोकांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. यानंतर देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. दरम्यान मरकजचा प्रमुख मौलाना साद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर साद फरार झाला आहे.

तबलीगी जमात आणि मरकजचा प्रमुख मौलाना साद याने एक ऑडिओ जारी केला आहे. या ऑडिओमध्ये साद सांगत आहे, संयम बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. केवळ धैर्यानेच आपल्या समस्येवर तोडगा काढू शकता. समस्या दोन प्रकारच्या आहेत. पहिली जी आपल्या आतमध्ये आहे आणि दुसरी बाहेर आहे. आपल्या अनुयायांना पुढे आणण्यासाठी प्रोत्साहित करणे हे राज्यकर्त्याचे काम आहे. परंतु ते तुलनेविषयी बोलत आहेत, यामुळे अंतर वाढेल. इस्लामच्या मते , सरकार लोकांच्या हक्कांवर दबाव आणत आहे. ही पद्धत योग्य नाही. कारण जर आपण त्यांच्याशी संघर्ष केला तर त्यांना वाटेल आपण बदला घेत आहोत. आणि त्यांचे समर्थन केले तर त्यांना वाटेल की आपण त्यांच्यासमोर गुडघे टेकले, असे आपल्या ऑडिओमध्ये सादने म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांनी जमातचे मौलाना मोहम्मद साद याच्यासह अनेक जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. जमातमध्ये सहभागी झालेल्या 1890 परदेशी नागरिकांविरोधात लुकआउट नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या लोकांनी व्हिसा नियमांचे उल्लंघन केले आणि कार्यक्रमाला हजेरी लावली. पोलिसांनी मरकझ येथून 500 हून अधिक परदेशी लोकांसह 2300 हून अधिक लोकांना बाहेर काढले होते.

या व्यतिरिक्त गुन्हे शाखेने मरकजशी संबंधित 18 लोकांना नोटीस बजावली असून तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. पोलिसांनी मौलाना साद याच्यासह 18 जणांना चौकशीला येण्यासाठी नोटीस बजावली आहे. मात्र, यापैकी 11 जणांनी आपण क्वारंटाईनमध्ये असल्याचे सांगून पोलिसांसमोर येण्यास टाळाटाळ करत आहेत. परंतु आता त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपला असून पोलीस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतात, असे सुत्रांचा दावा आहे.