Coronavirus Lockdown : ‘भाईजान’ सलमान बहिण अर्पिता आणि तिच्या मुलांसोबत पनवेलच्या फार्महाऊसवर ‘शिफ्ट’ झाला

पोलीसनामा ऑनलाईन :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2020(मंगळवारी) देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 24 मार्चपासून 21 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. बॉलिवूड स्टार सलमान खान राधे सिनेमाची शुटींग सोडून आपल्या कुटुंबासोबत पनवेलच्या फार्महाऊसमध्ये शिफ्ट झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, सलमान खान आपल्या आवडत्या ठिकाणी बहिण अर्पिता आणि आयुष शर्मा यांची मुलं आहिल आणि आयत सोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. कुटुंबातील इतरही मेंबर्स सलमान खान सोबत शिफ्ट झाले आहेत.

एका इंग्रजी वृत्तानुसार सलमान खानला त्याचा पूर्ण वेळ नन्ही परी आयतसोबत घालवायचा आहे. आयतचा जन्म सलमान खानच्या जन्माच्या दिवशीच 27 डिसेंबर रोजी झाला आहे. एका रिपोर्टनुसार सलमान खानला लहान मुलं खूप आवडतात. सलमानला त्याचा मोकळा वेळ अर्पिता आणि आयुष शर्मा यांची मुलं आहिल आणि आयत सोबत घालवायचा आहे.

View this post on Instagram

Ouii ma 30 million! Thank u all!

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

You might also like