Lockdown : ‘लॉकडाऊन’च्या काळात भीषण ‘अपघात’, टेम्पो-ट्रकच्या अपघातात 5 ठार, 6 जखमी

शमशाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात लॉकडाऊन केले असतानाही तेलंगणामध्ये एक मोठा अपघात झाला आहे़ ट्रकने पुढे जाणार्‍या टेम्पोला दिलेल्या धडकेत ५ मजूर ठार झाले असून ६ जण जखमी झाले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या असतानाही हे लोक टेम्पोमधून प्रवास करीत होते. तेलंगणामधील हे ३० मजून काम नसल्याने टेम्पोतून घरी जात होते. तेलंगणातील सूर्यापेठ येथून ते कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात जात होते. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास पाठीमागून आलेल्या ट्रकने टेम्पोला जोरात धडक दिली. त्यात टेम्पोतील ५ जण जागीच ठार झाले. इतरांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यात ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.

काम नसल्याने उपासमारीने मरण्याऐवजी गावी जाण्याचा निर्णय या मजूरांनी घेतला. पण, गावी पोहचण्याऐवजी ते शेवटच्या प्रवासाला गेले.