राज्य सरकार दीड महिन्यात करणार ‘बंपर’ भरती, राजेश टोपेंची मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यभरात कोरोनामुळे संकट उभे राहिले असून सध्याची वाढती संख्या पाहता राज्यात मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. मुंबईला तत्काळ बेड मिळायला हवेत. जूनपर्यंत डबलिगं रेट पाहता मुंबईमध्ये लाखभर पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यासाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 15 हजार मध्य बाधित रुग्ण आणि एक हजार आयसीयु बेडची व्यवस्था करण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबईची तुलना कोणत्याही शहराशी करून नये. कारण मुंबईत मोठमोठ्या झोपडपट्ट्या आहेत. दाट लोकवस्ती आहे. यामुळे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कमी रुग्ण सापडत आहेत. मुंबईत आठ मोठे अनुभवी अधिकारी काम करत आहेत. तसेच काही अधिकारी, संस्था यामध्ये काम करत आहेत. तसेच आमदारांना देखील यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. पण मुंबई महापालिकेने रिक्त जागा भरण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरातही भरती करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

आरोग्य खात्यात 17 हजार रिक्त जागा

टोपे यांनी सांगितले की, माझ्या आरोग्य खात्यात 17 हजार 337 जागा रिक्त आहेत. मेडिकल एज्युकेशनला 11 हजार जागा रिक्त आहेत. महापालिकांच्या हॉस्पिटलमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सगळ्या जगा पुढील दीड महिन्यात भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही. त्यांचे, गुण, अंतर्गत परीक्षा यावरून या जागा भरल्या जाणार आहेत. नर्सिंग काऊन्सिल, एमबीबीएसची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क हे विचारात घेतले जातील. आज उपलब्ध असलेले कर्मचारी अथक परिश्रम करत आहे. ते दमल्यानंतर नवीन दमाची टीम असणे गरजेचे आहे. यामुळे ही भरती तात्काळ करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.