मुलगा ‘पार्थ’चं नाव ऐकातच चिडले उपमुख्यमंत्री अजित पवार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकार्‍यांसह विभागीय आयुक्तांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकाराने तुमचा पार्थ सिंगापूरहून सुखरूप पोहचला का अशा पृश्न एकाने विचारला. त्यामुळे पार्थचे नाव ऐकताच पवारांचा पारा चढला. त्यांनी सांगितले की, पार्थ कधीच सिंगापूरला गेला नव्हता. काही लोक चुकीच्या बातम्या सांगतात.

तुम्हाला हवं तर त्याचा पासपोर्ट दाखवतो. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन चार महिन्यात तो काही सिंगापूरला गेलेला नाही. यावर पत्रकारांनी अजून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, आता मीच त्याचा बाप सांगतोय ना मग ऐका की असे उत्तर देत पासपोर्ट दाखवायचीही माझी तयारी असल्याचे सांगितले.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर असलेल्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. काही निर्णय 31 मार्च 2020 पर्यंत झाले होते, पण आता आम्ही निर्णय घेतला आहे पुढचे आदेश निघेपर्यंत सर्व निर्णयाची अमलबजावणी सुरु राहील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.