‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लोक एकटं राहणंच पसंत करत आहेत, पहा जगातील काही पॉझिटिव्ह ‘फोटो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्या जगात कोरोना विषाणूमुळे साडेचार लाखाहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. तर १८९६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. लोक बर्‍याच ठिकाणी एकटे राहत आहेत. लॉकडाउन मधील एकटेपणा आपल्याला त्रास देऊ शकतो. पण घाबरून जाण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला जगातील अशा देशांची छायाचित्रे दाखवणार आहोत, जिथे लोक एकटेच कोरोना विषाणूशी लढा देत आहेत…

फिलिपाइन्सची राजधानी मनिला येथील बाजारपेठा बंद आहेत, परंतु या व्यक्तीला काही आवश्यक वस्तूंसाठी जावे लागले. काय करणार ? फिलिपाइन्समध्ये कोरोनामुळे ६३६ लोक संक्रमित झाले आहेत. तर ३८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना सुन ले...अकेले हैं तो क्या गम है, देखिए दुनिया की पॉजिटिव तस्वीरें

हा फोटो ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समधील रेल्वे स्थानकाचा आहे. जिथे एक मुलगी उभी आहे. तिला न्यू साउथ वेल्स ते सिडनी असा प्रवास करायचा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुमारे २३६२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना सुन ले...अकेले हैं तो क्या गम है, देखिए दुनिया की पॉजिटिव तस्वीरें

हा माणूस सर्बियातील बेलग्रेड शहरातील कार्यालयात एकटाच काम करत होता. काम करून कंटाळा आला आणि तो डेस्कवर झोपला. सर्बियात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना सुन ले...अकेले हैं तो क्या गम है, देखिए दुनिया की पॉजिटिव तस्वीरें

ब्रिटनची राजधानी लंडनच्या कार्नाबी स्ट्रीटवर स्थित शेक्सपियर हेड रेस्टॉरंटच्या बाहेर एकटा बसलेला हा माणूस स्वत: मध्येच हरवला आहे. ब्रिटनमध्ये सध्या ८०७७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सुमारे ४२२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना सुन ले...अकेले हैं तो क्या गम है, देखिए दुनिया की पॉजिटिव तस्वीरें

इटलीच्या रोममधील आपल्या अपार्टमेंटच्या छतावर बसून हा व्यक्ती ताजी हवा खात आहे. जगात कोरोना विषाणूने इटलीमध्ये सर्वाधिक ६८२० मृत्यू झाले आहेत. येथे कोरोनामुळे सुमारे ७० हजार लोक संक्रमित आहेत.

कोरोना सुन ले...अकेले हैं तो क्या गम है, देखिए दुनिया की पॉजिटिव तस्वीरें

सेनेगलच्या नॉट्रे-डॅम चर्चमध्ये एकटा गेलेला हा माणूस देवाकडे प्रार्थना करत आहे की लवकरच या साथीच्या आजारापासून जगाची सुटका व्हावी. जेणेकरून लोक पुन्हा चर्चमध्ये एकत्र येऊ शकतील. सेनेगलमध्ये सध्या ६७ लोक कोरोनाबाधित आहेत. तर अद्याप कुणाचाही मृत्यू झालेला नाही.

कोरोना सुन ले...अकेले हैं तो क्या गम है, देखिए दुनिया की पॉजिटिव तस्वीरें

थायलंडच्या बँकॉकमधील एका गेम सेंटरमध्ये हा माणूस एकटा खेळत असून कोरोनाच्या भीतीला दूर करत आहे. कदाचित हा व्यक्तीच या सेंटरचा मालक असेल. थायलंडमध्ये ९३४ लोकांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आहे, तर ४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना सुन ले...अकेले हैं तो क्या गम है, देखिए दुनिया की पॉजिटिव तस्वीरें

ब्राझीलची राजधानी साओ पाउलो विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी सर्जिओ अँटोनियो पेरिया हा एकटाच आपला प्रबंध कार्यरत करण्यात गुंतला आहे. ब्राझीलमध्ये २२०१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना सुन ले...अकेले हैं तो क्या गम है, देखिए दुनिया की पॉजिटिव तस्वीरें

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या नॅशनल मॉलसमोर सकाळी हा एकटाच व्यक्ती धावत आहे, तो आपल्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. अमेरिकेत कोरोनाचे ५३ हजाराहून अधिक रुग्ण आहेत. तर ७११ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना सुन ले...अकेले हैं तो क्या गम है, देखिए दुनिया की पॉजिटिव तस्वीरें

इटलीच्या रोममधील कॅसल सेंट अँजेलोसमोर ही महिला एकटीच चालत आहे. कारण तिला चालण्याचा आनंद घ्यायचा आहे. इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे परिस्थिती अत्यंत वाईट आहे.

कोरोना सुन ले...अकेले हैं तो क्या गम है, देखिए दुनिया की पॉजिटिव तस्वीरें

भारताच्या मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन थांबली आहे. रेल्वेचा एक एकटा कर्मचारी या ट्रेनमध्ये झोपून कोणाशी तरी बोलत आहे. आतापर्यंत भारतात ५८७ लोकांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आहे. तर ११ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना सुन ले...अकेले हैं तो क्या गम है, देखिए दुनिया की पॉजिटिव तस्वीरें

अमेरिकेचे सुंदर शहर न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर जवळील ४२ व्या स्ट्रीटला पार करत असलेला हा व्यक्ती एकटा आणि दिव्यांग आहे. परंतु त्याला कोरोनाची अजिबात भीती नाही.

कोरोना सुन ले...अकेले हैं तो क्या गम है, देखिए दुनिया की पॉजिटिव तस्वीरें

चेक गणराज्य चे सुंदर शहर प्रागच्या या ब्रिज वर एकट्याने फिरणारा हा माणूस या शहराला इतक्या सुंदरतेने क्वचितच कधी पाहू शकला असता. चेक गणराज्यात कोरोनाची १४९७ लोकांना लागण झाली आहे. तर ३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना सुन ले...अकेले हैं तो क्या गम है, देखिए दुनिया की पॉजिटिव तस्वीरें

पोलंडमधील मारियक्का स्ट्रीटवर फिरणार्‍या या महिलेला हा रस्ता इतका रिकामा कधीच दिसला नसेल. सहसा या रस्त्यावर खूप गर्दी असते. पोलंडमध्ये ९२७ लोक कोरोनामुळे संक्रमित आहेत, तर १२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना सुन ले...अकेले हैं तो क्या गम है, देखिए दुनिया की पॉजिटिव तस्वीरें

कॅनडाच्या टोरांटोमधील नॅथन फिलिप्स स्क्वेअरजवळ हा व्यक्ती एकटाच जात आहे. कॅनडामध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १९५९ लोक संक्रमित झाले आहेत. तर २७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना सुन ले...अकेले हैं तो क्या गम है, देखिए दुनिया की पॉजिटिव तस्वीरें