तबलिगींविरोधात वेळीच कारवाई केली नसती तर तांडव माजलं असतं : योगी आदित्यनाथ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  तबलिगी जमातच्या सदस्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय योग्यच होता. तबलिगी जमातच्या सदस्यांविरोधात वेळीच कारवाई केली नसती तर उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये अराजकतेचा तांडव माजला असता. आम्ही काही मुठभर लोकांसाठी 23 कोटी लोकांच्या आयुष्याशी खेळण्याची सूट देऊ शकत नव्हतो. म्हणूनच कायद्यानुसार आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई केली, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्राी योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे.

काही जणांच्या बेजबाबदार वागण्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. तबलिगी जमातच्या सदस्यांना कोरोनाचा संसर्ग होणे हा काही अपराध नाही. मात्र हा आजार लपवल्याने संसर्ग वाढू शकतो आणि त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो हे ठाऊक असतानाही तशी परिस्थिती निर्माण होण्यासारखी वागणूक असणे गुन्हाच समजला पाहिजे.

तबलिगी जमातच्या काही लोकांनी हा गुन्हा केला आहे. एकीकडे सरकार तबलिगी जमातच्या लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये आणून त्यांची तपासणी केली जात होती. दुसरीकडे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही या लोकांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये आणि कोवीड रुग्णालयांमध्ये ज्या प्रकारे उद्धटपणे वर्तवणूक केली आणि चुकीच्या पद्धतीने वागले, मारहाण केली, पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकार्‍यांवर थुंकण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याने त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्यावर कारवाई केली नसती तर उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये अराजकतेचा तांडव माजला असता. आम्ही काही मुठभर लोकांना 23 कोटी लोकांच्या आयुष्याषी खेळू देऊ शकलो नसतो. म्हणून आम्ही कायद्यामध्ये राहून त्यांच्यावर कारवाई केली, असं योगींनी स्पष्ट केले आहे.