Coronavirus Lockdown : … म्हणून कोल्हापूरातील महिला सरपंचास अश्रू अनावर

पोलीसनामा ऑनलाइन –  जगभरात कोरोना व्हायरसबाबत जनजागृती सुरू आहे. त्यातच कोल्हापूरातील गावच्या प्रथम नागरिक अशी ओळख असलेल्या एका सरपंच महिलेने आवाहन करतानाच अश्रू अनावर झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथील सरपंच जोत्स्ना पठाडे यांनी मोबाइलवरून गावकर्‍यांना आवाहन केले. बोलत असताना त्या इतक्या भावूक झाल्या की त्यांना अश्रू अनावर झाले. ’आपल्याला आपलं गाव कोरोनापासून दूर ठेवायचे आहे. मुंबई आणि पुण्यावरून येणार्‍या लोकांनी स्वत:ला क्वारन्टाइन करून घ्यावे. मी तुमच्यासमोर गुडघे टेकते. तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यावी,’ असे आवाहन करताना त्या आपले अश्रू रोखू शकल्या नाहीत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक सामाजिक संघटना काम करत आहेत. पण कोल्हापूर जिल्ह्यात आता माजी सैनिक रस्त्यावर उतरले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हरळी या गावात हा प्रकार घडला आहे. गावच्या प्रवेशद्वारावर माजी सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like