जोडप्यानं धार्मिक स्थळावर बनवला ‘पॉर्न’ व्हिडीओ, ‘अपलोड’ केल्यानंतर सर्वत्र प्रचंड खळबळ

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : म्यानमारमधील एका धार्मिक स्थळावर एका जोडप्याने पॉर्न व्हिडिओ केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आहे आहे. इतकेच नाही तर व्हिडिओ बनल्यानंतर दोघांनीही हा व्हिडिओ पॉर्न साइटवर अपलोड केला आहे. ज्यांनंतर एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इटालियन जोडप्याने म्यानमारच्या पवित्र ठिकाणी बागानमध्ये त्यांचा 12 मिनिटांचा अश्लील व्हिडिओ बनविला. यानंतर हा व्हिडिओ एका लोकप्रिय पॉर्न वेबसाइटवरही अपलोड करण्यात आला. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की हे एखाद्या धार्मिक ठिकाणी शूट करण्यात आले आहे. या जोडप्याने सर्व प्राचीन पगोड्यातच रेकॉर्ड केले आहे. दरम्यान, स्थानिक लोकांना व्हिडिओमार्फत जेव्हा याबद्दल माहिती मिळाली, त्यावेळी त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी त्याबद्दल तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.

बागानमधील एका नागरिक सोसायटी गट मेयो सेट सॅनने सांगितले की, हा व्हिडिओ पाहून आम्हाला आश्चर्य वाटले आणि खूप वाईट वाटले. धार्मिक इमारत आणि पगोड्या बाहेर असे अश्लील कृत्य करणे सहन शक्तीच्या पलीकडे आहेत. याशिवाय ते बागानमध्ये घडले आहे. जो आपल्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाचा मौल्यवान वारसा आहे.’ तसेच सोशल मीडियावरही लोक या प्रकरणावर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओबद्दल, मग खिं गी यांनी फेसबुकवर आक्रोशवाल्या इमोजीसह सांगितले की, आमचे बागान पगोडे हे पवित्र स्थान आहे.

दरम्यान, 9 व्या आणि 13 व्या शतकाच्या दरम्यान बांधलेल्या जवळपास तीन हजार पागोडा आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेले बागान ही युनेस्कोने जाहीर केलेली जागतिक वारसा लाभलेले स्थळ आहे. एवढेच नव्हे तर दरवर्षी येथे मोठ्या संख्येने पर्यटक पोहोचतात. स्थानिकांसह परदेशी लोकांनाही या धार्मिक ठिकाणी अयोग्य कपडे घालण्यास मनाई आहे. शिवालय, मंदिर आणि धार्मिक इमारतींमध्ये अयोग्य कपडे घालण्यास पूर्णपणे बंदी आहे. म्यानमारच्या धार्मिक इमारती आणि त्यांच्या आवारात उघड्यावर चुंबन घेण्यासारख्या अयोग्य वर्तनास प्रतिबंधित असल्याचेही सांगितले गेले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like