निष्काळजीपणे वाहन चालविणार्‍या चालकास सासवड न्यायालयाकडून दंड

ADV

जेजुरी : जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहिती नुसार 2013 साली जेजुरी- सासवड रस्त्यावर हयगयीने, भरधाव वेगाने चारचाकी वाहन चालवून दुचाकीला ठोस देवून त्यावरील दोघांना गंभीर जखमी करणाऱ्या चालकास सासवड न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश श्रीमती दीपमाला पाटील यांनी एक वर्षाचे चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र, जखमींना तीन हजार रुपयांची भरपाई व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे .

या दिलेली माहिती अशी की,दि 22/10/2013 रोजी ओमीनी गाडी क्रमांक एम एच 12 ए एक्स 5139, गाडी चालक राजेंद्र आनंदराव जगताप रा. बेलसर,ता पुरंदर याने हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगाने गाडी चालवून जेजुरी सासवड रस्त्यावर लवथळेश्वर जवळ एका दुचाकीला धडक दिली . या अपघातात दुचाकीवरील निलेश तानाजी खैरे रा.टेकवडी ,ता पुरंदर व शुभम सुरेश वाघमारे रा. पिसर्वे ता. पुरंदर हे दोघे गंभीर जखमी झाले होते .

ADV

सदर ओमनी चालकावर जेजुरी पोलिसांनी भा द वी कलम 279, 337, 328, 427, व वाहन कायदा 184 अनव्ये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पो हवालदार रवींद्र काळभोर यांनी केला होता .सरकारी वकील सूरज मोहिते यांनी फिर्यादीच्या बाजूने या केसचे काम पाहिले . सासवड न्यायालयाने सदर वाहन चालकास नुकसान भरपाई व दंडाची शिक्षा ठोठावली आहे .