Covaxin | कोव्हॅक्सीन कोरोनाच्या ‘अल्फा-डेल्टा’ व्हेरिएंट्सवर परिणामकारक, भारताने बनवलेल्या व्हॅक्सीनचं अमेरिकेला समजलं महत्व

वॉशिंंग्टन : वृत्तसंस्था (Policenama online) – भारत बायोटेकने बनवलेली स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस (Vaccine) कोव्हॅक्सीनचा (Covaxin) परिणाम आता अमेरिकेने सुद्धा मान्य केला आहे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ (National Institutes of Health) (एनआयएच) ला आढळले आहे की, कोव्हॅकसीनमुळे शरीरात तयार झालेली अँटीबॉडीज कोरोना व्हायरसच्या (coronavirus) अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंट्सशी लढण्यासाठी उपयोगी आहे. कोव्हॅक्सीन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसोबत मिळून भारत बायोटेकने बनवली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

एनआयएचने सांगितले की, कोव्हॅक्सीन घेणार्‍या लोकांच्या ब्लड सीरमच्या अभ्यासातून हे समजले आहे की, लसीमुळे जी अँटीबॉडीज बनते, ती ब्रिटन आणि भारतात (Britain, India) सर्वात अगोदर सापडलेल्या कोरोनाच्या बी.1.1.7 (अल्फा) आणि बी.1.617 (डेल्टा) व्हेरिएंट्सवर परिणामकारक आहे.

यापूर्वी अमेरिकेचे इन्फेक्शन डिसीज एक्सपर्ट डॉक्टर अँथनी फाउची यांनी सुद्धा अनेकवेळा कोव्हॅक्सीनचे कौतूक केले आहे. फाउची यांनी म्हटले होते की, भारतात तयार केलेली कोव्हॅक्सीन कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स नष्ट करण्यात सक्षम आहे.

कोव्हॅक्सीन डेड कोरोना व्हायरसपासून बनवली आहे जी शरीरात या व्हायरसशी लढण्यासाठी योग्य अँटीबॉडीची निर्मिती करते. कोव्हॅक्सीनच्या दुसर्‍या टप्प्यातील ट्रायलच्या डेटानुसार, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. ही व्हॅक्सीन सिम्पटोमॅटिक प्रकरणात 78, तर असिम्पटोमॅटिक प्रकरणात 70 टक्के परिणामकारक आहे. कोरोनाच्या गंभीर प्रकरणात सुद्धा व्हॅक्सीन चांगली ठरत आहे.

Web Title :- covaxin effectively neutralises both alpha delta variants of covid 19 founds us top health institute

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नगरमध्ये महापौर, उपमहापौर निवडीपूर्वीच शिवसेनेत ‘राडा’ ! दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

भारत बायोटेकला मोठा ‘झटका’ ! भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्राझिलने केला ‘कोव्हॅक्सिन’चा 324 मिलियन डॉलरचा करार रद्द

Pune Crime News | बुधवार पेठेतील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा पर्दाफाश; सत्य आलं समोर

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट ! आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू