अफरीदीच्या नंतर ‘या’ दिग्गज खेळाडूला ‘कोरोना’ची लागण, क्रिकेटरची सासू देखील संक्रमित, क्रीडा विश्वात प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस जगभरात पसरला असून त्याचा प्रकोप अजूनही सुरूच आहे. आता कोरोनाची लागण क्रिकेट खेळाडूंनाही झाली आहे. मागच्या आठवड्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफरीदीला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता आणि आता बांगलादेशचा माजी कर्णधार मशरफे मुर्तजा यास कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मशरफे मुर्तजाने शुक्रवारी आपले सॅम्पल टेस्टसाठी दिले होते आणि शनिवारी त्याचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला.

घरातच आयसोलेट झाला मुर्तजा
मुर्तजाचा छोटा भाऊ मोर्सलिन बिन मुर्तजाने यास दुजोरा दिला आहे. त्याने म्हटले की, मुर्तजाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असून त्याला घरीच ठेवण्यात आले आहे. बांगलादेशात कोरोना व्हायरसची सुमारे 2 लाख प्रकरणे आहेत, 1425 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुर्तजाच्या सासूलाही कोरोनाची बाधा
मशरफे मुर्तजाच्या सासूलाही कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. 15 जूनला सासू कोरोना पॉजिटीव्ह असल्याचे समजले. कोरोना व्हायरस सर्वत्र पसरल्यानंतर मुर्तजाने बांगलादेशात अनेक लोकांची मदत केली आहे.