स्वतःला वाचवण्यासाठी टीम इंडियाचं नुकसान करतोय विराट कोहली, ‘हा’ घ्या पुरावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कसोटी क्रिकेटमधील विजयाच्या मागे विराट कोहलीची आक्रमता असल्याचे सांगितले जाते. परंतु एक फलंदाज म्हणून विराट कोहली असे काही करत आहे ज्यामुळे संपूर्ण टीमचे नुकसान होत आहे. रांची मधील कसोटीत कोहली केवळ बारा धावा काढून बाद झाला. परंतु यावर विराट कोहलीने लगेच रिव्हिव्ह घेतला कारण विराटला एलबीडब्लू साठी बाद ठरवले होते. मात्र विराट कोहलीचा हा निर्णय चुकला आणि त्याला मैदान सोडावे लागले.

सलग 9 रिव्हिव्ह चुकीचे घेतले विराट कोहलीने
हे वाचयन तुम्हाला नवल वाटेल पण विराट कोहलीने फलंदाज म्हणून सलग 9 रिव्हिव्ह चुकीचे घेतले आहेत. कोहलीने दोन वर्षांपूर्वी घेतलेला रिव्हिव्ह बरोबर आला होता. 2017 मध्ये कोलकत्यात श्रीलंकेविरोधात खेळताना कोहलीने घेतलेला रिव्हिव्ह बरोबर आला होता. परंतु त्यानंतर घेतलेल्या एकही रिव्हिव्ह मध्ये विराट कोहलीला यश आले नाही आणि यामुळे टीमचे नुकसान होत आहे.

म्हणून कोहली वारंवार रिव्हिव्ह घेतो
विराट कोहली भारतीय संघातील महत्वाचा फलंदाज आहे अनेकदा विराटने एकट्याने सामने जिंकले आहेत. विराट मैदानावर खेळात असेल तर समोरच्या टीमवर मोठा दबाव कायम राहतो. आक्रमकता आणि उत्तम टायमिंग सध्या करता येत असल्यामुळे विराट मोठी धावसंख्या उभारू शकतो म्हणूनच अनेकदा तो रिव्हिव्ह सुद्धा घेत असतो.

नुकत्याच एका कसोटीमध्ये नॉर्त्जे च्या एका चेंडूवर चकवा खाऊन विराट बाद झाला. नॉर्त्जे ची कारकिर्दीतील पहिली विकेट होती. असे करणारा तो चौथा गोलंदाज ठरला आहे. वेस्टइंडीझच्या अलजारी जोसफने सुद्धा विराटला बाद करून आपली पहिली विकेट घेतली होती.

 

visit : Policenama.com

You might also like