IPL 2020 : क्रिकेटचं किट घेण्यासाठी नव्हते पैसे, वडिल होते ड्रायव्हर, मुलगा आज आयपीएलमध्ये करतोय ‘धमाल’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (CSK Vs SRH) यांच्यात झालेल्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना नवीन स्टार पाहायला मिळाला. सनरायझर्सचे प्रियम गर्ग हा तरुण फलंदाज आहेत. ज्या फलंदाजाच्या हाफ सेंचुरीची सर्वत्र चर्चा होत आहे. प्रियमने चेन्नईविरुद्ध फक्त 26 चेंडूत 51 धावा केल्या. विशेष म्हणजे सनरायझर्स पव्हिलियनचा सर्वात मोठा स्टार परत आला त्या वेळी त्याने हा डाव खेळला. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कर्णधारपद भूषवणाऱ्या प्रियमचा क्रिकेटच्या मैदानावरचा प्रवास कठीण होता. प्रियमच्या संघर्षाची कहाणी तुम्हाला देखील भावनिक करेल.

वयाच्या 11 व्या वर्षी आईला गमावले
उत्तर प्रदेशच्या मेरठपासून 25 कि.मी. अंतरावर असलेल्या परीक्षितगड येथे राहणारा प्रियमने 11 वर्षांचा असताना आईला गमावले. मुलाने क्रिकेटर व्हावे, अशी आईचे स्वप्न होते. मुलगा आज एक यशस्वी क्रिकेटर झाला आहे, पण ते पाहण्यास आई जिवंत नाही. 2011 मध्ये आईच्या निधनानंतर प्रियमने त्याच्या आईची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी खूप परिश्रम घेतले. दररोज अभ्यासाबरोबरच तो क्रिकेटच्या मैदानावर 8 तास सराव करायचा. तर 7 वर्षांनंतर, 2018 मध्ये, त्याची उत्तर प्रदेश रणजी संघात निवड झाली.

वडिलांसाठी खर्च चालविणे अवघड होते
त्या काळात घराचा खर्च चालवण्यासाठी प्रियमचे वडील नरेश गर्ग स्कूल व्हॅन चालवत असत. प्रियमला पाच भावंडे आहेत. कुटुंब मोठे होते. अशा परिस्थितीत त्याच्या वडिलांसाठी घरी चालवणे एक कठीण आव्हान होते. पण असे असूनही, त्यांनी प्रियमची क्रिकेटविषयीची आवड कधीही कमी होऊ दिली नाही. क्रिकेट किट विकत घेण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून वडिलांनी मित्राकडून कर्ज घेत मुलाची मागणी पूर्ण केली. वयाच्या 6 व्या वर्षापासून प्रियमला वडिलांनी क्रिकेट कोचिंगसाठी पाठवायला सुरवात केली. आज त्याच्या वडिलांच्या मेहनतीचे फळ मिळत आहे.

प्रियमने केली धमाल
– सन 2018-19 च्या रणजी सीजनमध्ये डेब्यू करत प्रियमने 800 पेक्षा जास्त रन बनवले होते.
– गोव्याविरुद्ध आपल्या डेब्यू मॅचमध्ये सेंचुरी केली होती.
– 2018-19 के रणजी सीजनमध्ये प्रियमने 67.83 च्या सरासरीने 2 शतके आणि 4 अर्धशतके केली होती.
– गेल्या अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारताला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले.
– सनरायझर्सने मागील वर्षी त्याला 1.9 कोटीमध्ये खरेदी केले.