खळबळजनक कबुली ! ‘कोणताच क्रिकेट सामना प्रामाणिकपणे खेळला जात नाही, सर्व फिक्स असतात’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – क्रिकेटचे जेवढे सामने होतात, जे चाहते आनंद घेऊन पाहत असतात ते सर्व सामने फिक्स असतात, असा धक्कादायक खुलासा एका मोठ्या सट्टेबाजाने केला आहे.

२००० साली क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचे मोठे प्रकरण बाहेर आलं होत. याप्रकरणातील दोषी सट्टेबाज संजीव चावलाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. “कोणताही क्रिकेट सामना प्रामाणिकपणे खेळाला जात नाही आणि लोक पाहत असलेले हे सर्व सामने फिक्स असतात. यात अंडरवर्ल्ड माफियांचा संबंध असतो. ज्याप्रमाणे चित्रपट कोणीतरी दिग्दर्शीत करतो, तसेच क्रिकेट सामन्यांचेही असते. ही लोकं फार भयंकर असतात, जर त्यांचे काम झाले नाही तर ते कोणाचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे बऱ्याच व्यक्ती त्यांना घाबरून हे काम करत असतात.” अशी माहिती संजीव चावला याने दिल्ली पोलिसांना दिली आहे.

मूळचा भारतीय असलेला संजीव चावला १९९३ साली कपड्यांच्या व्यवसायासाठी लंडन मध्ये गेला होता. तेथून तो आपला सगळा कारभार करत होता. २००० मध्ये त्याला ब्रिटनच नागरिकत्व मिळालं. दक्षिण आफ्रिकेच्या २००० च्या भारत दौऱ्याला चावला आणि अनेकांनी मॅच फिक्सिंग केली होती. चावला आणि हॅन्सी क्रोन्जे यांच्यातील संभाषणातून पैसे आणि संघामधील माहिती दिली जात असल्याचं उघड झालं होत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोन्जे याने आपण मॅच फिक्सिंग केल्याची कबुली दिली होती.

दरम्यान, याप्रकरणाची अधिक माहिती देण्यास विशेष पोलिस आयुक्त (क्राइम) परवीर राजन यांनी नकार दिला. जामीन मिळाल्याने संजीव चावला सध्या जेलबाहेर आहे. याबाबत दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, पुढील महिन्यात त्याप्रकरणी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like