WI विरुद्ध खेळण्यास ‘इच्छुक’ रोहित शर्मा, सेलेक्टर्स विश्रांती देण्यावर ठाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बांग्लादेश विरुद्ध टेस्ट सीरीज झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला वेस्टइंडीज बरोबर मैदानात उतरायचे आहे आणि या देशांतर्गत सीरिज साठी टीम इंडियाची निवड गुरुवारी होणार आहे. मिळालेल्या सूत्रांनुसार टीम इंडिया चे सेलेक्टर्स वनडे आणि टी २० संघाची निवड करणार आहेत. सांगितले जाते कि सेलेक्टर्स रोहित शर्माला वनडे सीरिजसाठी आराम देऊ शकतात. परंतु मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडियाचे उपकप्तान आराम करण्याच्या मूडमध्ये नसून वेस्ट इंडिज च्या विरुद्ध खेळण्यास इच्छुक आहेत.

रोहितला आराम नकोय !
मुंबई मिरर मध्ये छापून आलेल्या रिपोर्टनुसार रोहित शर्मा (Rohit Sharma) वेस्टइंडीज च्या विरुद्ध वनडे आणि टी२0 सीरीज मध्ये खेळण्यास इच्छुक आहे. खरंतर रोहित शर्मा सध्या जोरात फॉर्म मध्ये प्रदर्शन करत आहे आणि आपली हि लय अशीच टिकवून ठेवण्यासाठी तो कटिबद्ध आहे. परंतु सेलेक्टर्सच्या मते भारतीय संघाला न्यूजीलैंडच्या मोठ्या दौऱ्यावर जायचे आहे त्यामुळे त्या आधी रोहित शर्माला आराम मिळने आवश्यक आहे.

रोहित शर्मा या वर्षाच्या सुरुवातीपासून सलग क्रिकेट खेळत आहे. तसेच वर्ल्ड कप नंतर च्या काळापासून देखील रोहित शर्मा सलग क्रिकेटमध्ये खेळत आपले योगदान देत आहे. आता तर रोहित शर्मा टेस्ट टीम मध्ये देखील ओपनरच्या भूमिकेत सज्ज झाला आहे त्यामुळेच सेलेक्टर्स ना वाटते कि ‘हिटमॅन’ ला आरामाची गरज आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड कप नंतर कप्तान विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या समवेत दुसऱ्या खेळाडूंना देखील आराम देण्यात आला आहे तसाच रोहितलाही आराम मिळावा असे सेलेक्टर्सना वाटते. सेलेक्टर्स रोहित शर्माला वनडे सिरीज मध्ये आराम देणार आहेत कारण टी२० सीरीज पेक्षा जास्त आराम मिळणार.

आता जर सेलेक्टर्सने रोहित शर्मास आराम दिला तर मयंक अग्रवाल यास वेस्टइंडीज विरुद्ध वनडे सीरीज मध्ये संधी मिळू शकते. मयंकने टेस्ट फॉर्मेट मध्ये स्वतःला सिद्ध करत ८ टेस्ट मध्ये ७१.५ च्या सरासरीनुसार ८५८ धावा काढल्या आहेत. या काळात त्याने एक शतक, दोन द्विशतक आणि तीन अर्धशतकांची कामगिरी केली आहे. मयंकची आक्रमक खेळी बघून सेलेक्टर्स मयंकला वनडे फॉर्मेटमध्ये संधी देण्यास उत्सुक आहेत. आता सगळ्यांच्या नजरा २१ नोव्हेंबर ला होणाऱ्या सेलेक्टर्स च्या बैठकीकडे आहे, त्यामध्ये रोहित ला आराम आणि मयंक ला संधी देण्याबाबत निर्णय होणार आहे.

Visit : Policenama.com