MS धोनीच्या निवृत्तीचा ‘फैसला’ 24 ऑक्टोबरला, सौरभ गांगुली करणार निवड समितीसोबत चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीसीसीआयचा नवीन अध्यक्ष सौरव गांगुली भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याबरोबर त्याच्या निवृत्तीविषयी चर्चा करणार आहे. त्यानंतर 24 ऑक्टोबर रोजी निवड समितीच्या सदस्यांशी होणाऱ्या चर्चेत तो आपले मत मांडणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी गांगुलीच्या निवडीची अधिकृत घोष करण्यात येणार आहे. त्यानंतर 24 तारखेला बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे.

निवड समिती काय विचार करत आहे
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सौरव गांगुली याने बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात माध्यमांशी साधलेल्या संवादामध्ये म्हटले की, 24 तारखेला मी निवड समिती सदस्यांची भेट घेणार आहे, त्यावेळी मी या गोष्टींवर चर्चा करणार आहे. त्यानंतर मी माझे मत प्रदर्शित करेल. धोनी याने 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून एकदिवसीय सामन्यांमध्ये तो अजूनही खेळत असून त्याने सध्या विश्रांती घेतली आहे.

धोनीशी करणार चर्चा
धोनीच्या प्रश्नावर बोलताना गांगुली म्हणाला की, तो याविषयावर धोनीबरोबर बोलणार आहे. धोनी याविषयी काय विचार करत आहे यावर त्याचे मत विचारायला हवे. यावेळी मी त्याच्या बरोबर याविषयी चर्चा करणार आहे.

24 तारखेला कोहलीची घेणार भेट
खेळाडू इतका मोठा ब्रेक घेऊ शकतो का ? या प्रश्नावर बोलताना गांगुली म्हणाला कि, मी त्यावेळी नव्हतो माझी हि निवड समितीबरोबर पहिली बैठक असणार आहे. त्याचबरोबर गांगुली 24 तारखेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी देखील चर्चा करणार आहे.

3 महिन्यांपासून धोनी विश्रांतीवर
धोनी सध्या 38 वर्षांचा असून वर्ल्डकपमधील सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून काही काळ त्याने भारतीय सैन्याची सेवा देखील बजावली. अनेक वेळा त्याच्या निवृत्तीची चर्चा समोर येते, मात्र अधिकृतपणे काहीही माहिती समोर आलेली नाही.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी