दुचाकी चोरणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात, 3 वाहने जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पार्किंग केलेल्या दुचाकी चोरणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

रविंद्र ज्ञानदेव राऊत (रा. गणेशविहार सोसायटी, नहेगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन शिथिलथेनंतर शहरातील विविध भागात गुन्हे वाढीत आहेत. परंतु वाहन चोरी थोड्या प्रमाणात कमी झाली आहे. तर दुसरीकडे जामिनावर सुटलेल्या कैद्यांनी पुन्हा गुन्हेगारी सुरू केली आहे.

त्यामुळे संचित रजेवर कारागृहातून बाहेर आलेल्यावर नजर ठेवली जात आहे. त्यावेळी नऱ्हे गावातील भैरवनाथ मंदीरासमोर राहाणाऱ्या एकाने चोरलेल्या दुचाकी लपवून ठेवल्याची माहिती पोलिस शिपाई नितीन रावळ आणि कैलास साळुंखे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. तसेच रवींद्र राऊत याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे, विल्सन डिसोझा, नितीन रावळ, कैलास साळुंके, किशोर शिंदे, दत्तात्रय गरुड, राहूल घाडगे, दीपक मते, गजानन गानबोटे, अतुल साठे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like