राज्यात घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांच्या गुन्हे शाखेच्या युनिट १ ने मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ५२२ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम, चांदीचे दागिने असा एकूण १७ लाख २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. युनिट-१ ने ही कारवाई हडपसर येथील ग्लायडींग सेंटरच्या मोकळ्या मैदानात केली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9c6c7f29-c7c9-11e8-8cd7-c543167c9887′]

हर्षद उर्फ पक्या गुलाब पवार (वय-२४ रा. बांदल हाईट्स, पिरंगुट, सध्या रा. मुंब्रा दिवा, ठाणे), दिनेश मधुकर देशमुख (वय-३८ रा. लक्ष्मी हौसींग सोसायटी, रुपीनगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे शहरात वाढत्या घरफोडीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांचा शोध घेत असाताना युनिट १ चे पोलीस शिपाई गजानन सोनुने यांना पवार आणि देशमुख हे दोघे ग्लायडींग सेंटरच्या मोकळ्या मैदानात संशयितरित्या बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून दोघांना अटक केली. दोघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी पंधारा दिवसांपूर्वी फुरसुंगी येथील श्रीविला अपार्टमेंटमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात दोघांना अटक करुन अधिक तपास केला. तपासा दरम्यान या दोघांनी मागील दीड वर्षापासून हडपसर, विश्रांतवाडी, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, अलंकार, बिबवेवाडी, कोरेगांव पार्क, मुंढवा, हिंजवडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल २६ घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून ५२२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८८० ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिने, रोख १५ हजार, गुन्ह्यात वापरलेली यामाहा एफझेड दुचाकी असा एकूण १७ लाख २०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a154e72b-c7c9-11e8-a3f2-c1d293ea4fb7′]

तपासा दरम्यान या दोघांनी सोलापूर, चाकण, लोणीकंद तसेच राज्यातील इतर भागात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. अटक करण्यात आलेला हर्षद पवार हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर ४० गुन्हे दाखल आहेत. तर देशमुख याच्यावर दोन गुन्हे दाखल आहे. या दोघांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
[amazon_link asins=’B07CK51LT9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a8cc10f1-c7c9-11e8-898a-7351eda2a362′]

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ समिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, पोलीस उप निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस उप निरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी गजानन सोनुने, पोलीस हवालदार प्रकाश लोखंडे, रिजवान जिनेडी, अशोक माने, प्रशांत गायकवाड, सुधाकर माने, सुभाष पिंगळे, तुषार माळवदर, महिला पोलीस हवालदार अनुराधा धुमाळ, उमेश काटे तुषार खडके, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, सचिन जाधव, इम्रान शेख यांच्या पथकाने केली.

हुश्श ….! इंधनाच्या दरामध्ये ५ रुपयांची कपात : अर्थमंत्री अरुण जेटली