गुन्हे शाखेकडून 50 रेकॉर्डवरील गुन्हेगार चौकशीसाठी ताब्यात

शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेरील आवारातुन घेतले ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सराईत आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी करण्यास सुरवात केली आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आज (मंगळवार) शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेरील परिसरातुन तब्बल 50 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असुन पोलिस आयुक्‍तालयात त्यांना नेण्यात आले आहे. तेथे त्यांच्याकडे सखोल चौकशी चालु करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्‍त, सह पोलिस आयुक्‍त, गुन्हे शाखेचे उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेला तडीपार गुंड, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि सराईत गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे पोलिसांनी सराईतांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्‍त भानुप्रताप बर्गे, पोलिस निरीक्षक दत्‍ता चव्हाण, अंजुम बागवान, मनिषा झेंडे, सुनिल दोरगे आणि त्यांच्या पथकाने आज शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात तसेच बाहेरील बाजुन येणार्‍या जाणार्‍यांवर लक्ष केंद्रीत केले.

शिवाजीनगर न्यायालयात वेगवेगळ्या कारणांसाठी येणार्‍यावर लक्ष ठेवल्यानंतर परिसरात तब्बल 50 जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आढळुन आले. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले असुन त्यांना चौकशीसाठी पोलिस आयुक्‍तालयात नेण्यात आले आहे. तेथे त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संघटीत गुन्हेगारी टोळया तसेच काही समाजकंटक निवडणुकीच्या काळात अनुचित प्रकार करू नयेत म्हणुन आगामी काळात देखील गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अशा प्रकारची तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like