लसूण चोरांना लोणीकंद पोलिसांकडून जेरबंद 

वाघोली (ता.हवेली ) : पोलीसनामा ऑनलाईन – वढु खुर्द येथील निंजाकार्ट गोडाऊनच्या वॉचमनला दमदाटी व  मारहाण  करून १३ ते १४ जणांनी लसणाच्या तीस गोण्या व त्यांचा जवळील मोबाईल असा एकूण अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्या प्रकरणी  लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला होता.

ही  घटना बुधवारी  सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस.हके यांच्या मार्गदर्शनाखाली बारा तासांच्या आत  दोन आरोपींना जेरबंद करण्यास यश  आले असून पुढील आरोपी लवकरच निष्पन्न होतील. गुन्हयाचा तपास चालू आहे.

Visit : Policenama.com