पुण्यात खंडणी मागत दुकानांची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वाईन शॉप चालकाला २ लाखांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देऊन तीन दुकानांची तोडफोड केल्याची घटना लष्कर परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान याप्रकऱणी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

आदित्य उर्फ मन्या भोसले(28,रा.भवानी पेठ), सुशील दिनेश भडकवाल(27,भवानी पेठ), संतोष उर्फ बाळा रघुनाथ गायकवाड(35,रा.मोदीखाना), डेनलील डिक्रुज जोन्स(35,रा.भवानी पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आनंद गुलाब जवारे(43,रा.गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जवारे यांचे लष्कर परिसरातील कल्पतरू अपार्टमेंटमध्ये न्यूयॉर्क वाईन शॉप आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्याकडे चारजण आले. त्यांनी जवारे यांना खंडणीची मागणी केली. २ लाख रुपये दे नाहीतर जीवे मारू अशी धमकी देत खंडणी मागितली.

त्यानंतर त्यांच्या दुकानातील काचेच्या रॅकवर सिमेंट ब्लॉकने मारले. त्यात रॅक फउटला. त्यानंतर त्यांनी पुढे जात क्लासिक स्क्वेअर सोसायटीतील प्रतिक धनराज जैन यांच्याही दुकानीतील काउंटरवरील काच फोडून कोयता दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तुकाराम कुंभार यांच्यावरही कोयता उगारून राहूल रॉयचा मॅटर क्लोज कर नाही तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी देत त्यांच्या पोटात आणि डोक्यात हाताने मारहाण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.