वाघोलीत लाखोंच्या दिव्याखाली अंधार, पथदिव्या वरील दिवे शोभेचे

शिक्रापुर : प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचात असलेल्या वाघोली ग्रामपंचायत कडून लाखो रुपये खर्च करून पुणे नगर महामार्गावर बसविलेले दिवे गेल्या काही महिन्यापासून सुरुच झाले नाही ते बंदच आहेत त्यामुळे लाखो रुपये खर्च करुन बसवलेल्या दिव्याखाली अंधारच असल्याचे दिसत आहे.माञ वाघोली ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असून या दिव्याखाली उजेड दिसणार केव्हा? असा प्रश्न वाघोलीतील सुज्ञ नागरिकांना पडला आहे.

मागील सात ते आठ महिन्यापुर्वी वाघोली ग्रामपंचायतकडून सुमारे अंदाजे ३२ लाख रुपये खर्च करून पुणे नगर महामार्गावरील बकोरी फाटा ते कटकेवाडी पर्यत रस्तादुभाजकावर ८६ पथदिवे बसविण्यात आले आहे.माञ आज पर्यत ते पथदिवे चालु झालेले नाहीत .त्यामुळे ते सुरू कधी होणार याचे उत्तर नागरिकांना मिळत नाही.आता पर्यत रस्ता दुभाजकावरील दिवे येणाऱ्या जाणाऱ्यासाठी फक्त शोभेचे दिवे झाले आहेत.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून कर रुपी गोळा केलेल्या पैशाची अश्या प्रकारे उधळपट्टी करुन लाखो रुपये खर्च करून बसलेले हे दिवे ठेकेदार जगवण्यासाठी केलेला आटापिटा आहे का?असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.आता पर्यत यातील दोन ते तीन दिवे नागरिकांना उजेड देण्याआधिच तुटून पडले आहेत. यामुळे लवकरात लवकर हे दिवे चालू करण्यात यावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.

याबाबत ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार यांनी सांगितले की आतापर्यंत यासाठी लागणारे लाइट मीटर नसल्याने ते काम रखडले होते.तसेच आता केबल अंडरग्राउंड करण्यात येणार असून त्यानंतर लवकरात लवकर लाईट सुरू करण्यात येईल.तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगी विषयी विचारले असता माझ्या आधी हे काम झालेले आहे त्यामुळे याबाबत मला माहिती घ्यावी लागेल असे त्यांनी सांगितले.

याबाबत गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांचाशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेउन माहिती देतो असे सांगितले.

सुरवातीला मीटर मिळत नव्हते नंतर कोरोनामुळे विलंब झाला .त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने वरुन लाइन टाकण्यासाठी विरोध केल्याने आता अंडरग्राउंड करण्यात येणार असून लवकरात लवकर लाईट चालू होइल.