फ्लॅटधारकांची फसवणूक : दरोडे – जोग बिल्डर्सवर FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – सोसायटीची पूर्वबांधणी करुन देतो, असे सांगून विकसन करारनामा करुन मुदतीनंतरही गेली ५ वर्षे इमारतीचा ताबा न देता २ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी दरोडे जोग बिल्डर्स व त्यांच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
सुधीर चंद्रकांत दरोडे (रा़ सदाशिव पेठ) आणि आनंद धुंडीराज जोग (रा़ नटराज सोसायटी, कर्वेनगर, कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्या संचालकांची नावे आहेत.

या प्रकरणी हेरंब दत्तात्रय टांकसाळे (वय ६९, रा़ अमृतकुंभ सोसायटी, एरंडवणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी, पौड रोडवर शिला विहार कॉलनीजवळ झेलम को आपरेटिव्ह सोसायटी आहे. या सोसायटीचे सभासद आणि दरोडे जोग बिल्डर्स यांच्या सोसायटीचे पुर्नबांधणी (रिडेव्हलमेंट) करुन देण्याचा विकसन करारनामा व कुलमुख्यत्यार करुन घेण्यात आले. ३० ऑगस्ट २०१२ रोजी हा करार करण्यात येऊन २७ महिन्यात बांधकाम पूर्ण करुन फ्लॅटचा, पॉर्किंगचा व सोसायटीचा ताबा देण्याचे ठरले होते.

त्यात काळात सभासदांना दुसरीकडे रहावे लागत असल्याने त्यांना दरमहा भाडे देण्याचे ठरले होते. असे असले तरी २७ महिन्यांनंतर त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही़ तसेच फिर्यादी व इतर सभासदांची भाड्यापोटी देय असलेली रक्कम ६७ लाख ५२ हजार २५४ रुपये, वेळेत ताबा न दिल्याने दंडापोटी देय असलेली रक्कम ९४ लाख रुपये, सिर्किंग फंड पोटी देय असलेली १८ लाख रुपये व देना बँकेकडून सोसायटीस गॅरंटी इन्व्होकमेंट पोटी देय असलेली ५० लाख रुपये असे सर्व मिळून २ कोटी २९ लाख ५२ हजार २५४ रुपयांची रक्कम फिर्यादी व इतर सर्व सभासदांना न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. स्वत:च्या नावावर फ्लॅट असताना त्यांना गेली ७ वर्षे भाड्याच्या खोली राहावे लागत आहे.

Visit : Policenama.com